Maharashtra 10th Result Before May 15; 11th Admission From May 17
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात 5 किंवा 7 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर आठवड्याभरात म्हणजे 15 मेपू
.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती. त्यात 37 हजार 338 विद्यार्थ्यांनी बारावीची, तर 32 हजार 433 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थी व पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला बारावीचा निकाल एप्रिल महिन्याच्या शेवटची लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण मध्येच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारल्याने हा निकाल आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे. आता हा निकाल पुढील आठवड्यात 5 किंवा 7 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
दहावीचा निकाल 15 मेपर्यंत लागण्याची शक्यता
बारावीचा निकाल लागल्यानंतर 4-5 दिवसांनी दहावीचा निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. राज्यात 17 मे पासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा निकाल तत्पूर्वी लागण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशाची लांबत जाणारी प्रक्रिया टाळण्यासाठी तसेच पुढील प्रवेशपूर्व परीक्षांमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्येच पूर्ण करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार परीक्षाही पार पडली. परंतु आता संपामुळे निकालाची प्रक्रिया रखडली आहे. याचा परिणाम आतापुन्हा अकरावीच्या प्रवेशाला बसण्याची शक्यता आहे.
का लांबला निकाल?
गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी संपावर आहेत. 18 मार्चला परीक्षा संपल्यावर साधारणपणे 2 एप्रिलपर्यंत बारावी आणि 10 एप्रिलपर्यंत उत्तरपत्रिका तपासून जमा होणे अपेक्षित होते. परंतु उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली आहे. त्यानंतर जी रिपोर्ट बनवून त्याची तपासणी करावी लागते. तेव्हढी प्रक्रिया बाकी आहे. दोन तीन दिवसा निकालाची तयारीही होती. परंतु आता कर्मचारी संपामुळे ती लांबली आहे, अशी माहिती विभागीय मंडळातील सहाय्यक सचिव दीपक कोकतरे यांनी नुकतीच दिव्य मराठीशी बोलताना दिली होती.

हे ही वाचा…
ऑटो-टॅक्सी चालकांसाठी नवा फॉर्म्युला समोर:मराठी सक्तीवर सरकारचा यू-टर्न की दिलासा? चालकांना 6 महिन्यांची मुदत

मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 1 मेपासून हा निर्णय लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या निर्णयावरून महायुती सरकारमध्येच मतभेद उघड झाले असून, काही नेत्यांनी याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सरकारकडून या निर्णयाचा फेरविचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. वाचा सविस्तर
