‘Say Aurangabad, otherwise they will kill you’ tourist’s video creates tension in Ajanta, Hindu community holds protest, two groups raise slogans | हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा, दोन गटांची प्रचंड घोषणाबाजी: ‘औरंगाबाद बोल, नहीं तो बहोत मारेंगे’ पर्यटकाच्या व्हिडिओने अजिंठ्यात तणाव – Chhatrapati Sambhajinagar News

Advertisements
Advertisements



‘संभाजीनगर मत बोल,औरंगाबाद बोल नहीं तो बहोत मारेंगे’ असे अजिंठ्यात एका पर्यटकाला धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अजिंठा गावात मंगळवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. व्हिडिओच्या निषेधार्थ हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दुपारी साडेबा

Advertisements

.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे मोठा अनुचित प्रकार टळला. या मोर्चाचे कारण २५ जुलै रोजी घडलेली घटना होती. मुंबईतील एक युवक भारत भ्रमंती दौऱ्यावर असताना अजिंठा बस स्थानकावर आला. त्याला कोठे चालला विचारल्यावर त्याने संभाजीनगर चाललो असे सांगितले. त्यावर दुसऱ्या व्यक्तीने ‘संभाजीनगर मत बोल, औरंगाबाद बोल, नहीं तो ते को बहुत मारेंगे’ असे म्हणत वाद घातला. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी व्हायरल झाला. त्यानंतर अजिंठा पोलिसांनी औरंगाबाद बोलणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले. कायदेशीर कारवाई केली. त्याने माफी मागितल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला.

मात्र, संभाजीनगरचा अपमान करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरी नंतर थेट अजिंठा पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांना निवेदन दिले. या मोर्चात धानोरा येथील सर्वानंद सरस्वती महाराज, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, सुनील मिरकर, कमलेश कटारिया, अरुण दादा काळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.

कडक कारवाई करण्यात येईल…

धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध आधीच कायदेशीर कारवाई केलेली आहे. हे निवेदन वरिष्ठांना पाठवून त्यांच्या मार्गदर्शनाने अजून काय कडक कारवाई करता येईल त्याप्रमाणे केली जाईल. -अमोल ढाकणे, सपोनि, अजिंठा.

आंदाेलकांचा पोलिस ठाण्यात एक तास ठिय्या

मोर्चेकऱ्यांनी या वेळी संबंधितावर योग्य कडक कारवाईच्या मागणीसाठी अजिंठा पोलिस ठाण्यात एक तास ठिय्या दिला. सगळ्यांची सपोनि यांनी अमोल ढाकणे यांनी समजूत काढून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Advertisements
  • Related Posts

    Shivsena Protest Shivaji Nagar Underpass Water Leak | शिवाजीनगर भुयारी मार्गात पाणी गळती: शिवसेना ठाकरे गटाचे ‘आठवा अजूबा’ आंदोलन, पालकमंत्र्याच्या दबावापोटी घाईत उद्घाटन केल्याचा आरोप – Chhatrapati Sambhajinagar News

    छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज गुरुवार २१ ऑगस्ट रोजी जोरदार आठवा अजूबा आंदोलन करण्यात आले. महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तर…

    Raj Thackeray Proposes Concrete Plan to Solve Mumbai’s Traffic and Parking Problems | अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा: राज ठाकरेंचे CM फडणवीसांना आवाहन- माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा! – Mumbai News

    अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहररावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *