
‘संभाजीनगर मत बोल,औरंगाबाद बोल नहीं तो बहोत मारेंगे’ असे अजिंठ्यात एका पर्यटकाला धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अजिंठा गावात मंगळवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. व्हिडिओच्या निषेधार्थ हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दुपारी साडेबा
.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे मोठा अनुचित प्रकार टळला. या मोर्चाचे कारण २५ जुलै रोजी घडलेली घटना होती. मुंबईतील एक युवक भारत भ्रमंती दौऱ्यावर असताना अजिंठा बस स्थानकावर आला. त्याला कोठे चालला विचारल्यावर त्याने संभाजीनगर चाललो असे सांगितले. त्यावर दुसऱ्या व्यक्तीने ‘संभाजीनगर मत बोल, औरंगाबाद बोल, नहीं तो ते को बहुत मारेंगे’ असे म्हणत वाद घातला. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी व्हायरल झाला. त्यानंतर अजिंठा पोलिसांनी औरंगाबाद बोलणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले. कायदेशीर कारवाई केली. त्याने माफी मागितल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला.
मात्र, संभाजीनगरचा अपमान करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरी नंतर थेट अजिंठा पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांना निवेदन दिले. या मोर्चात धानोरा येथील सर्वानंद सरस्वती महाराज, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, सुनील मिरकर, कमलेश कटारिया, अरुण दादा काळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.
कडक कारवाई करण्यात येईल…
धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध आधीच कायदेशीर कारवाई केलेली आहे. हे निवेदन वरिष्ठांना पाठवून त्यांच्या मार्गदर्शनाने अजून काय कडक कारवाई करता येईल त्याप्रमाणे केली जाईल. -अमोल ढाकणे, सपोनि, अजिंठा.
आंदाेलकांचा पोलिस ठाण्यात एक तास ठिय्या
मोर्चेकऱ्यांनी या वेळी संबंधितावर योग्य कडक कारवाईच्या मागणीसाठी अजिंठा पोलिस ठाण्यात एक तास ठिय्या दिला. सगळ्यांची सपोनि यांनी अमोल ढाकणे यांनी समजूत काढून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.