
श्रावण महिना शिव उपासनेसाठी पवित्र महिना आहे, भगवान भोलेनाथांनी जे विष प्राशन केले, त्यासाठी सर्व देवतांनी त्यांची स्तुती केली. ती एक महिनाभर केली, तो महिना म्हणजे श्रावण महिना, श्रावणात श्रवण करणे म्हणजे भगवंताच्या कथा, कीर्तन, सकारात्मक दृष्टीचे श्
.
मोहाडी येथे गोवर्धने कुटुंबीयांच्या वतीने संत सावता महाराज मंदिरात रोज सायंकाळी सहा वाजता संगीत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले. कथाकार रजनीताई जाधव यांनी शिवमहिमा सांगत शिवाची महती विस्तृत केली. सामान्य जीवनाचा प्रवास दिव्यतेने दिव्यत्वेकडे दिव्यत्वाला प्राप्त करण्यासाठी असावा यासाठी ज्या दिव्य पुराणाचे श्रवण केले जाते, त्यास शिवमहापुराण म्हणतात असे सांगितले. शिवपुराण हे अठरा पुराणांपैकी एक आहे. शिवलिंगाच्या उत्पत्तीशी व शिवभक्तिशी संबंध कथा आहे. शिवालिला कथा व त्यांची उपसना समाविष्ट आहे, असे सांगितले. सोहळ्यात शिव व पार्वतीचा विवाह सोहळा साजरा करत जयजयकार करण्यात आला. यावेळी शिव विश्वास तर पार्वती श्रद्धा आहे. “भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपीनौ” म्हणून जीवनात श्रद्धा व विश्वासाचे ऐक्य असले तर गणेशरूप मंगल असे जीवन मनुष्याला प्राप्त होते, असा उपदेश रजनीताई जाधव यांनी केले.