"सर्वोदय'चे आज अधिवेशन:"देशातील आजची परिस्थिती व सर्वोदयाची भूमिका'' यावर चर्चा
![]()
महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या घटनेतील तरतुदीनुसार लोकसेवकांचे एक दिवसीय अधिवेशन तथा वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २६ एप्रिलला जे.आर.डी.टाटा इंग्लिश स्कूल खडकी अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन लेखक व पत्रकार श्रीमंत माने यांचे हस्ते व महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रमेश अण्णा दाणे यांचे अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. अ.भा.सर्व सेवा संघाचे मंत्री अॅड. अविनाश काकडे, सर्व सेवा संघाचे मॅनेजिंग ट्रस्टी मोहम्मद शेख हुसेन, निरीक्षक प्रतिनिधी भूपेश भूषण, अनुपपुर भूदान, मंडलाचे सचिव एकनाथ डगवार, भूदान मंडलाचे संयुक्त सचिव नरेंद्र बैस सर्व सेवासंघाचे विश्वस्त सोमनाथ रोडे,आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, शेतकरी जागर मंच अध्यक्ष प्रशांत गावंडे, ज्येष्ठ गांधीवादी महेंद्रबाबू गोयनका यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अधिवेशनात पहिल्या सत्राचा प्रारंभ सर्वधर्म प्रार्थनेने होईल. उद्घाटन समारंभानंतर “महाराष्ट्र व देशातील आजची परिस्थिती आणि सर्वोदयाची भूमिका’ या विषयावर चर्चा करण्यात येईल. तसेच ग्रामदान-भूदान चळवळी संदर्भात विचार विनिमय करण्यात येईल. बीज भाषणानंतर लोकसेवकांना चर्चेत सहभाग घेता येईल. दुपारचे सत्रात पुढील तीन वर्षांकरिता कार्य संकल्प करण्यात येईल. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ६ वाजता सर्वोदय चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरणाऱ्या “गांधी विचार दर्शन व व्यसनमुक्त भारत’ प्रदर्शनीचे उद्घाटन विजय कौसल, कामगार नेते प्रदीप वखारिया, डॉ. झीशान हुसेन, रेडक्रॉस अकोलाचे सचिव प्रभजितसिह बच्छेर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. विवेक हिवरे, सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड, ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, डॉ. शि. ना. ठाकुर, सचिव डॉ. मिलिंद निवाणे, श्याम पन्नालाल शर्मा, संयोजक अनिल मावळे, भाऊराव गावंडे, आत्माराम शेळके, जयप्रकाश वाकोडे, नितीन भरणे, महेश आढे यांनी केले आहे.
