किनवटजवळ भीषण अपघात:दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या जीपची झाडाला धडक; चौघांचा जागीच मृत्यू, 6 गंभीर

महाराष्ट्र

[ads1]


श्रावण मासानिमित्त किनवट तालुक्यातील कैलास टेकडी व सहस्रकुंड येथील महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणा राज्यातील पारडी (बी) गावाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपला सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दिपला नाईक तांड्याजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या दुर्घटनेत तीन भाविकांसह चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील पारडी (बी) येथील भाविक श्रावण मासानिमित्त 31 ऑगस्ट रोजी किनवट तालुक्यातील कैलास टेकडी येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कैलास टेकडीवरून ते सहस्रकुंडकडे रवाना झाले. सहस्रकुंड येथे महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर, ते ए.पी. 25 एच.एच. 6747 क्रमांकाच्या महिंद्रा कमांडर जीपने सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पारडी (बी) गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात दरम्यान, दिपला नाईक तांड्याजवळ चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की जीपचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातस्थळावरील दृश्य अत्यंत मन हेलावून टाकणारे होते. अपघातामध्ये यांचा मृत्यू या अपघातात तुम सायबुलू (वय 70), तुम गौराईबाई (वय 60) आणि आऊला गंगन्ना (वय 75) (सर्व रा. पारडी (बी), तेलंगणा) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच जीप चालकाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. अपघातातील अन्य सहाजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील भैंसा (हैसा) येथे हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे पारडी (बी) परिसरात शोककळा पसरली असून, श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हे ही वृत्त वाचा

मुंबईत-बुरखा घातलेल्या 2 महिलांना रुग्णालयाच्या गेटवर थांबवले:बुरखा काढण्याच्या मागणीवरून महिला पोलिसांशी वाद
मुंबईतील बीएमसी संचालित कूपर रुग्णालयाच्या गेटवर बुरखा घालून आलेल्या दोन महिलांना रोखल्याची घटना समोर आली आहे. या महिला रुग्णालयात दाखल असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी आल्या होत्या. यादरम्यान रुग्णालयात तैनात असलेल्या महिला पोलिस कर्मचारी आणि त्या महिलांमध्ये जोरदार वाद झाला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकाने सुरक्षेचे कारण देत आणि लहान मुलांच्या चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी गेटवर प्रवेश करणाऱ्यांची ओळख पटवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. वाचा सविस्तर

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *