मुंबई ड्रग्ज पार्टीतील आरोपीच्या कंपनीत नगरसेवकाची भागीदारी:भागिदार होतो, आता राजिनामा दिला- नगरसेवक

0
new-project-2026-04-24t065642895_1776993982.jpg




मुंबईतील नेस्को सेंटर येथे झालेल्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट ड्रग्ज पार्टी प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघाले असतानाच, आता या प्रकरणाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहेत. या पार्टीतील मुख्य ड्रग्ज पेडलर आनंद लक्ष्मण पटेल आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील एमआयएमचे नगरसेवक सोहेल सय्यद (कुरेशी) हे चक्क व्यावसायिक भागीदार असल्याचे समोर आले. या दोघांनी मिळून एलआरएस ग्रेन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केलेली आहे. त्याचे पुरावे ‘डीबी स्टार’च्या हाती लागले आहेत. पुराव्यांनुसार, 4 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीची नोंदणी करण्यात आली असून तिचा पत्ता जिन्सी, छत्रपती संभाजीनगर येथील आहे. मुंबईत ड्रग्ज पुरवणाऱ्या एका आंतरराज्य पेडलरचे संभाजीनगरमधील लोकप्रतिनिधीशी आर्थिक हितसंबंध असणे, हे अत्यंत गंभीर मानले जात आहे. एमआयएमच्या नेत्याचे नाव एका ड्रग्ज माफियासोबत जोडले गेल्याने तपास यंत्रणांचे लक्ष आता शहरातील या कनेक्शनकडे वळले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेशन माफिया बापाचा वारसा, आता ड्रग्जचा धंदा आनंद पटेल याचा बाप लक्ष्मण पटेल हा कल्याणमधील कुप्रसिद्ध रेशन माफिया असून त्याच्यावर मोक्का आणि एमपीडीएसारख्या गंभीर कारवाया झालेल्या आहेत. बापाने रेशनिंगच्या धान्यातून काळाबाजार केला, तर मुलाने आता ड्रग्ज पेडलिंगमध्ये हात काळे केले. नगरसेवक सोहेल सय्यद यांची कोंडी एमआयएमचे नगरसेवक सोहेल सय्यद (कुरेशी) या कंपनीत 4 डिसेंबर 2022 पासून डायरेक्टर पदावर आहेत. ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीसोबतची ही भागीदारी आता त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीसोबत त्यांनी व्यवहार का केले, याचे उत्तर आता त्यांना जनतेला आणि पोलिसांना द्यावे लागणार आहे. ही केवळ व्यावसायिक भागीदारी आहे की यामागे काही मोठे षड‌्यंत्र आहे, याचा तपास करणे गरजेच आहे. त्याचे वडील माझ्या ओळखीचे आनंद पटेलचे वडील लक्ष्मण पटेल हे माझ्या ओळखीचे आहेत. टीव्ही, वृत्तपत्रातून मिळालेल्या माहितीवरून आनंद पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजले. एलआरएस कंपनीत मी आनंदसोबत संचालक होतो. परंतु, मी सहा महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आहे. – सोहेल सय्यद (कुरेशी), नगरसेवक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed