अमरावती व्हिडिओ प्रकरण:अयानला पायी फिरवून सिन रिक्रिएट; मोबाईल,थार कार, शस्त्रही जप्त; चौघांची कोठडी 27 एप्रिलपर्यंत वाढवली

0
bea1e2b4-60f0-40f9-a729-36a2a181455a_1776878673269.jpg




अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अयानला पोलिसांनी बुधवारी परतवाडा येथे पायी फिरवले. थार वाहनात अयानजवळ दिसलेला मोबाईल जप्त करण्यासाठी पोलिसांनी ‘सिन रिक्रिएट’ केले. अयानने तो मोबाईल एका मित्राला दिल्याचे सांगितले होते. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी व्हिडीओमध्ये दिसलेले थार वाहन आणि पिस्टलसदृश शस्त्रही जप्त केले आहे. अयानने ज्या मित्राला मोबाईल दिला होता, त्याचे घर समरसपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, ठाण्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. एसआयटीच्या हाती दोन दिवसांपूर्वी एक नवा व्हिडीओ लागला होता. या व्हिडीओनुसार, अयान महिंद्रा थार वाहनात बसलेला दिसत असून त्याच्या शेजारी महागडा मोबाईल, पिस्टलसदृश वस्तू आणि नोटांचे बंडल ठेवलेले होते. ही सर्व सामग्री आता एसआयटीने जप्त केली आहे. वाहनातील पिस्टलसदृश शस्त्र आणि महिंद्रा थार वाहन हे राजेश रोशन प्रजापती (वय ५०, रा. सावळी दातुरा, ता. अचलपूर) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ते त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. गेल्या ११ एप्रिल रोजी परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मुलींचे अयानसोबतचे १८ अश्लील व्हिडिओ आणि ३९ छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलीस अंमलदार निलेश काळे यांच्या तक्रारीवरून १३ एप्रिल रोजी अयान आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर सुरुवातीला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात दोन वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या कोठडीत एक आठवड्याची वाढ करण्यात आली. अयान अहमद आणि त्याचे तीन साथीदार उजेर खान इकबाल खान, मो. साद इकबाल खान आणि तरबेज खान मो. साबीर अशा चौघांचीही पोलीस कोठडी (पीसीआर) २७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. सहायक सरकारी वकील डी. ए. नवले आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी न्यायालयात प्रभावीपणे आपली बाजू मांडून सर्व चारही आरोपींची पुन्हा आठवडाभराची पोलीस कोठडी मिळवली. यावेळी अचलपूर न्यायालयाला एकप्रकारे पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed