ममता बॅनर्जींचे वर्तन त्यांच्या पराभवाचे लक्षण:पश्चिम बंगालची जनता भाजपसोबत; इंडिया आघाडीने महिला आरक्षण बिलाची 'क्रूर हत्या' केली- चंद्रशेखर बावनकुळे

0
1745480373-4_1776750575.jpg




पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ज्या प्रकारे वागत आहेत त्यातूनच दिसून येत आहे की तिथे त्यांचा पराभव होणार आहे. तिथली जनता ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मतदान करणार असल्याचे दिसून येत आहेत, असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर भोंदू खरात प्रकरणी एसआयटी सर्वच बाजूने लक्ष घालत आहे. त्यामध्ये आर्थिक बाजूने सुद्धा लक्ष दिले जात आहे. या प्रकरणाकडे स्वत: मुख्यमंत्री लक्ष देऊन आहेत. सर्व गोष्टीचा तपास अगदी योग्य पद्धतीने सुरू आहे. जे काही पुढे येईल त्यावर योग्य कारवाई केली जाईल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महिला आरक्षणाला विरोध करण्याचे काम राहुल गांधी आणि त्यांच्या बगलबच्चांनी केले आहे. जर विधेयक मंजूर झाले असते तर 350 हून अधिक महिला खासदार लोकसभेत गेल्या असत्या. महाराष्ट्राच्या विधिमंडळात जवळपास 150 ते 160 महिला आमदार झाल्या असत्या. त्यामुळे आत देशभरातील 70 कोटी महिलांमध्ये नाराजी आहे. म्हणून आम्ही मोर्चा काढत आहोत. इंडिया आघाडीने महिला आरक्षण बिलाची क्रुर हत्या केली आहे. महायुतीमध्ये मतभेद नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मांतर बंदी कायदा लवकरच लागू करावा यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीमध्ये थोडे मतभेद झाले हे खरे आहे. पण मतभेद हे काही कायम नाही, ते थोड्या काळापर्यंतच होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत हा तिढा सोडवला आहे. महिला विरोध करणाऱ्या खासदारांचा पराभव करतील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 350 हून अधिक महिलांना संसदेत जाता यावे यासाठी महिला आरक्षण बिल आणले होते. काँग्रेस आणि इंडिया आघाडीने महिलांची ही संधी हिसकावून घेतली. महिलांचे मतदान घ्यायचे आणि महिलांसाठी काम करायचे नाही अशी भूमिका नेहमी काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे महिला आणि जनता त्यांच्याविरोधात आहेत. 211 खासदारांनी या बिल विरोधात मतदान केले तिथल्या महिला यांचा पराभव करतील. नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी आता एक रुपयाही नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही. यापूर्वी तहसीलदारांच्या मान्यतेशिवाय वाटणी करता येत नव्हती. पण आता शेतकऱ्यांनी आपसी वाटणी केली की केवळ 500 रुपयांमध्ये रजिस्टर नोंदणी करायची. त्यासाठी आता कोणतेही शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी तहसीलदारांकडे जाण्याची गरज नाही.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks