पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर भीषण अपघात:पीएमपी बसच्या धडकेत सायकलस्वार 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

महाराष्ट्र

[ads1]


पुणे शहरातील गणेशखिंड रस्त्यावर पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चतु:शृंगी पोलिसांनी पीएमपी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोहेल नूर अन्सारी (वय 21, रा. जनवाडी, गोखलेनगर, मूळ रा. बिहार) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र रेहान इक्रम अन्सारी (वय 19) याने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल आणि रेहान हे दोघे मूळचे बिहारचे असून मजुरी करतात. सायकलस्वार रेहान आणि त्याचा मित्र सोहेल गणेशखिंड रस्त्याने जात असताना, भरधाव पीएमपी बसने त्यांच्या सायकलला पाठीमागून धडक दिली. या धडकेत सायकलवर मागे बसलेला सोहेल पीएमपी बसच्या चाकाखाली सापडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक एन. कारंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत एका व्यक्तीवर तीक्ष्ण शस्त्राने वार दरम्यान, गुलटेकडी परिसरात पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत एका व्यक्तीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख सलीम बागवान (वय 31, रा. इंदिरानगर वसाहत, गुलटेकडी) याने याबाबत फिर्याद दिली आहे. रुपेश मारुती कांबळे (वय 38, रा. इंदिरानगर वसाहत, गुलटेकडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि बागवान हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांच्यात पूर्वी वाद झाले होते. आरोपीने बागवानला अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर बागवान गुलटेकडीतील गनीबाबा दर्गा परिसरातील टेकडीवर गेला. आरोपी रुपेश तेथे पोहोचला आणि ‘तू पोलिसांचा खबरी आहेस’ असा आरोप करत त्याने बागवानवर चाकूने वार केले. या हल्ल्यात बागवान जखमी झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक बी. पी. शिरसाठ या प्रकरणाचा तपास करत आहेत.

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *