
तालुक्यातील दहीगाव रेचा शेतशिवारात कामासाठी गेलेल्या ३२ वर्षीय महिलेचा जिवंत वीज तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २५) दुपारी घडली आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या ग्रामवासीयांनी महिलेचा मृतदेह थेट महावितरण कार्याल
.
रूपाली शुद्धोधन सावळे, (३२, रा. दहीगाव रेचा) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दहीगाव रेचा येथील अरुण टकोरे यांच्या शेतात गावातील काही महिला कामासाठी गेल्या होत्या. त्यामध्ये रूपाली सावळेसुद्धा होत्या. शेतात काम करत असतानाच {उर्वरित. पान ४ ^या प्रकरणात तक्रारीवरून महावितरणचे संबंधित परिसरातील अभियंता तसेच कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -सूरज तेलगोटे, एपीआय, प्रभारी ठाणेदार, अंजनगाव सुर्जी. अंजनगाव महावितरणच्या कार्यालयात महिलेचा मृतदेह घेऊन आलेले नातेवाईक, ग्रामस्थ.
महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला