Loan Rejection Reasons | जास्त पगार असूनही बँक कर्ज देत नाहीये? तर ‘या’ ४ गोष्टींकडे लक्ष द्या
Loan Rejection Reasons | उत्तम पगार असूनही बँक कर्ज देण्यास नकार देते, हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. फक्त मोठी सॅलरी (Salary) असणं पुरेसं नसून, बँका अर्जदाराच्या आर्थिक सवयी, जबाबदाऱ्या आणि इतिहासाची सखोल तपासणी करतात. त्यामुळे काही छोट्या चुका देखील कर्ज मंजुरीसाठी अडथळा ठरू शकतात.
अनेकांना वाटतं की जास्त पगार म्हणजे कर्ज सहज मिळेल, पण प्रत्यक्षात बँका तुमच्या खर्चाच्या पद्धतीकडे जास्त लक्ष देतात. जर तुमच्या उत्पन्नातील मोठा भाग भाडे, आधीपासूनचे ईएमआय, महागड्या सेवांवरील खर्च आणि इतर गरजांमध्ये खर्च होत असेल, तर तुमच्याकडे बचतीसाठी कमी रक्कम उरते. अशा परिस्थितीत नवीन कर्जाचा हप्ता भरण्याची क्षमता कमी असल्याचं बँकेला वाटू शकतं. (Loan Rejection Reasons)
याशिवाय, पूर्वीच्या आर्थिक व्यवहारातील चुका देखील मोठा अडथळा ठरतात. उदाहरणार्थ, क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर न भरणं किंवा जुन्या कर्जाचा हप्ता चुकवणं यामुळे तुमच्या क्रेडिट अहवालावर नकारात्मक परिणाम होतो. अशा नोंदी पाहून बँका तुमच्या आर्थिक शिस्तीबाबत शंका घेतात आणि त्यामुळे कर्ज नाकारण्याचा निर्णय घेतला जातो.
Loan Rejection Reasons | कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक काळजी :
नोकरीतील स्थिरता ही देखील बँकांसाठी महत्त्वाची बाब असते. वारंवार नोकरी बदलणाऱ्या किंवा अनिश्चित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना बँकांकडून कर्ज मिळणं कठीण जाऊ शकतं. कारण भविष्यात नियमित उत्पन्न राहील का, याबाबत बँका खात्री करून घेतात.
तसेच, कर्ज नाकारल्यानंतर अनेक बँकांमध्ये एकाच वेळी अर्ज करणे टाळावे. यामुळे बँकांना तुमची आर्थिक स्थिती अस्थिर असल्याचा संशय येऊ शकतो. कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरणे, मर्यादित खर्च करणे, आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आणि नोकरीत स्थिरता राखणे या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
