Affordable 7 Seater Cars | देशातील 5 सर्वात स्वस्त 7-सीटर कार; मोठ्या कुटुंबासाठी उत्तम पर्याय
Affordable 7 Seater Cars | भारतीय बाजारपेठेत मोठ्या कुटुंबांची गरज लक्षात घेता सात आसनी वाहनांना (7-Seater Cars) मोठी मागणी आहे. जागा, इंधन बचत आणि परवडणारी किंमत अशा त्रिसूत्रीवर आधारित गाड्यांची निवड करणे मध्यमवर्गीय खरेदीदारासाठी महत्त्वाचे असते. आपल्या संपूर्ण परिवाराला एकत्रित प्रवासाचा आनंद घेता यावा, यासाठी देशातील सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय गाड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.
बजेटमधील परवडणारे पर्याय आणि लवचिकता
निसान मॅग्नाइट (Nissan Magnite)
ही सध्याच्या काळातील सर्वात किफायतशीर ७-सीटर म्हणून समोर आली आहे. आकाराने कॉम्पॅक्ट असूनही तिन्ही रांगांची आसनव्यवस्था हे तिचे वैशिष्ट्य आहे, ज्याची किंमत ५.६५ लाख ते ८.९४ लाख रुपयांच्या (Ex-showroom) दरम्यान आहे
रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber)
ही गाडी तिच्या आसनांच्या रचनेतील लवचिकतेसाठी प्रसिद्ध आहे. गरजेनुसार मागच्या जागा काढून सामानासाठी जागा वाढवता येते, तसेच सर्व प्रवाशांसाठी एसी व्हेंट्सची (AC Vents) सोय असल्याने लांबचा प्रवास सुखकर होतो.
ट्रायबर
हिची किंमत ५.७६ लाख ते ८.३९ लाख रुपयांपर्यंत असून मध्यमवर्गीयांच्या खिशाला ती परवडणारी आहे. आधुनिक फीचर्स आणि आरामदायी प्रवासासाठी या दोन्ही गाड्यांनी बाजारात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. विशेषतः लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी हे दोन्ही पर्याय तांत्रिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जातात.
महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero)
तिच्या मजबुतीसाठी ओळखली जाते. खडतर रस्त्यांवरही उत्तम कामगिरी करणारी ही गाडी ७.९९ लाख ते ९.८० लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. बोलेरोचीच आधुनिक आवृत्ती असलेली बोलेरो निओ (Bolero Neo) ही अधिक आरामदायी इंटिरियरसह येते, ज्याची किंमत ८.६९ लाख ते १०.९४ लाख रुपयांपर्यंत आहे. या गाडीत सुधारित कुशनिंग आणि आर्मरेस्ट्स (Armrests) देण्यात आले आहेत, ज्यामुळे चालकाचा थकवा कमी होतो.
मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga)
ही भारतीय रस्त्यांवरील ‘किंग ऑफ ७-सीटर’ मानली जाते. आरामदायक आसनव्यवस्था, तिसऱ्या रांगेतील पुरेशी जागा आणि चार्जिंग पोर्ट्ससारख्या सुविधांमुळे ती एक परिपूर्ण फॅमिली कार ठरते. एर्टिगाची किंमत ८.८० लाख ते १२.९४ लाख रुपयांच्या दरम्यान असून तिची इंधन कार्यक्षमता ग्राहकांना अधिक आकर्षित करते. मोठ्या कुटुंबाच्या सहलीसाठी हे सर्व पर्याय सध्या भारतात सर्वोत्तम मानले जातात.
News Title: Affordable 7 Seater Cars for Big Families India
