![]()
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे मे २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) व कृषी शिक्षण (Agriculture Education) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या संध
.
पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीची सीईटी प्रवेश परीक्षा दिनांक १० व ११ मे २०२६ रोजी ४ सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण १ लाख १६ हजार ५४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सीईटी परीक्षेत ४ सत्रात मिळून ९५ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ३५ हजार ३४५ विद्यार्थी होते व ६० हजार २८५ विद्यार्थिनी होत्या तर १ तृतीयपंथीय होते. यामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीची संख्या जास्त आहे. या सीईटीला ८२.०६ % विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
हि सीईटी परीक्षा राज्यातील ९४ हजार ९८३ तर राज्याबाहेरील ६४८ विद्यार्थ्यांनी दिली. हि सीईटी परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यातील १८४ परीक्षा केंद्रावर संगणकाधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने घेण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षा घेण्यात आली नाही.
१०० पर्सेंटाईल गुण मिळविणारे ४ विद्यार्थी
पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या या सीईटीमध्ये एकूण ४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. राज्यातील पालघर येथील झील हितेश छेडा, पुणे येथील मोहनीश मारुती भोसले, छत्रपती संभाजीनगर येथील मुस्कान मुकेश नाथानी व मुंबई शहरातील रौश्मीत गुप्ता या ४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. यामध्ये २ विद्यार्थिनी आहेत.
| विद्यार्थ्याचे नाव | जिल्हा | पर्सेंटाईल गुण | प्रवर्ग |
| झील छेडा | पालघर | १००.०० | खुला (Open) |
| मोहनीश भोसले | पुणे | १००.०० | खुला (Open) |
| मुस्कान नाथानी | छत्रपती संभाजीनगर | १००.०० | खुला (Open) |
| रौश्मीत गुप्ता | मुंबई | १००.०० | खुला (Open) |
| साहीम साकिब पटवेगर | कोल्हापूर | ९९.९९ | ओबीसी (OBC) |
| मुचापथी रानेश | पुणे | ९९.९९ | एसबीसी (SBC) |
| निलभ शरद कदम | सांगली | ९९.९९ | एसईबीसी (SEBC) |
| गिरीश मंगलसिंग गोठवाल | जळगाव | ९९.९८ | डीटी / व्हिजें (DT/VJ) |
| संदेश ज्ञानेश्वर खडसे | अकोला | ९९.९६ | एससी (SC) |
| ओम सुरेश बिचकुले | सोलापूर | ९९.९६ | एनटी २ सी (NT2 C) |
| अर्जुन सुधीर पेंदोर | रायगड | ९९.९५ | एसटी (ST) |
| देवानंद उद्धव चाटे | नांदेड | ९९.९४ | एनटी ३ डी (NT3 D) |
| श्रद्धा संतोष हिवरकर | बुलढाणा | ९९.८७ | एनटी १ बी (NT1 B) |
| पूर्वा श्रीधर कुलकर्णी (राज्याबाहेरील) | बेळगाव (कर्नाटक) | ९९.९७ |
दोन्ही संधीमध्ये सर्वोच्च यश मिळविणारे विद्यार्थी
पालघरमधील झील हितेश छेडा या विद्यार्थिनीने दोन्ही संधीमध्ये १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. कोल्हापूर येथील साहीम साकिब पटवेगर या विद्यार्थ्यांनी पहिल्या संधीमध्ये १०० पर्सेंटाईल तर दुसऱ्या संधीमध्ये ९९.९९ पर्सेंटाईल गुण मिळवून ओबीसी प्रवर्गात सर्वोच्च पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. व जळगाव येथील गिरीश मंगलसिंग गोठवाल या विद्यार्थ्यांनी पहिल्या संधीमध्ये ९९.९७ पर्सेंटाईल तर दुसऱ्या संधीमध्ये ९९.९८ पर्सेंटाईल गुण मिळवून डीटी/ व्हिजे प्रवर्गात सर्वोच्च पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत.
प्रथमच प्रवेश परीक्षेच्या दोन संधी
राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या (मेन ) दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही मिळाव्यात म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार यावर्षापासून सीईटी कक्षाने या वर्षापासून प्रथमच एमएचटी सीईटी (पीसीएम समूह ), एमएचटी सीईटी (पीसीबी समूह ) व एमबीए/ एमएमएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) दोन वेळेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार यावेळी प्रथमच या तीन अभ्यासक्रमाच्या दोन वेळेस प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या. यानुसार ज्या विद्यार्थ्यानी यावेळेस दोन प्रवेश परीक्षा दिल्या असतील तर त्याचा दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त पर्सेंटाईल (Percentile) असलेला निकाल प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल.
पर्सेंटाईल व टक्केवारी यातील फरक
सीईटीचा निकाल हा पर्सेंटाईलमध्ये जाहीर केला जातो. विद्यार्थ्यांनी सीईटीचा निकाल पाहताना टक्केवारी न पाहता पर्सेंटाईल पहावे. टक्केवारी म्हणजेच पर्सेंटेज (Percentage) हे तुम्हाला १०० पैकी मिळालेला एक निश्चित भाग किंवा गुण दर्शवते. तर पर्सेन्टाईल हे इतर उमेदवारांच्या तुलनेत तुमचं रँकिंग म्हणजेच तुम्ही स्पर्धेत कुठे आहात, हे दर्शवते. टक्केवारी एकूण गुणांपैकी तुम्हाला मिळालेला हिस्सा दाखवते, तर पर्सेन्टाईल तुम्ही इतरांपेक्षा किती पुढे आहात हे दाखवते. हे पर्सेन्टाईल हे अत्यंत अचूक आणि योग्य पद्धतीनेच कॅल्क्युलेट केलेले असतात. त्यामुळे त्यामध्ये कोणतीही तफावत किंवा चूक असण्याची शक्यता नसते.
