छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला चांगला प्रतिसाद:आखाडा बाळापूर येथे प्रमाणपत्रांचे वाटप; लाभार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत

0
whatsapp-image-2026-04-17-at-41635-pm_1776423797.jpeg




आखाडा बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत शुक्रवारी तारीख 17 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. या शिबिरामुळे मंडळ स्तरावर विविध प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल विभागाच्या वतीने आखाडा बाळापूर येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते तहसीलदार जीवक कुमार कांबळे, नायब तहसीलदार बालाप्रसाद धूत, ग्रामपंचायतच्या प्रशासक भिमाबाई नरवाडे यांची उपस्थिती होती यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी मार्गदर्शन केले. गाव पातळीवर लाभार्थ्यांची कामे गतिमान व्हावी तसेच प्रशासन लोकाभिमुख व कार्यक्षम व्हावे या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मागील काही दिवसांपासून रखडलेले प्रलंबित फेरफार निकाली काढले जात आहे. सातबारा मधील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र दिले जात आहे. या अभियानामुळे नागरिकांची मोठी सोय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर केले जात असून सातबाराची कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील इतर महसूल मंडळामध्ये देखील अशा प्रकारचे शिबिर आगामी काळात घेतले जाणार असून या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले
या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांचे सातबाराचे प्रलंबित फेरफार निकाली काढण्यात आले असून सातबारा दुरुस्ती करून लाभार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या अभियानामुळे लाभार्थ्यांची मोठी सोय झाली असून लाभार्थ्यांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *