अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री बनणार होते, असा दावा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला होता. आता या दाव्याला शरद पवार गटाकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. शरद पवार गटाचे विकास लवांडे यांनी गौप्यस्फोट केला असून, ‘अजितदादा भाजपला कंटाळले होते आणि २०२८ ला ते महायुतीतून बाहेर पडणार होते हे सत्य आहे,’ असा दावा त्यांनी केला आहे. बारामती हॉस्टेलवरील ‘त्या’ गुप्त बैठकीचा संदर्भ अतुल लोंढे यांनी केलेल्या विधानाला दुजोरा देताना विकास लवांडे यांनी एका बैठकीचा दाखला दिला. ते म्हणाले, अतुल लोंढे यांनी केलेले हे विधान शंभर टक्के सत्य आहे. कारण, १९ जानेवारी २०२६ रोजी मी स्वतः बारामती हॉस्टेलला आमदार रोहित पवार यांच्यासमवेत अजितदादांशी चर्चा करत होतो. यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना दादांनी अतिशय स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली होती. ‘भाजपसोबत आपलं फार काही टिकणार नाही’ अजित पवारांच्या नेमक्या शब्दांचा संदर्भ देत लवांडे यांनी दावा केला. ते म्हणाले, त्या बैठकीत दादांनी स्पष्टपणे सांगितले होते की, भारतीय जनता पार्टीबरोबर आपलं फार काही टिकणार नाही. त्यांचा प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय. त्यामुळे २०२८ ला आपण या सरकारमधून बाहेर पडणार आहोत. आपल्याला एकत्रित आल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, हे खुद्द अजितदादांचे शब्द होते.” ‘दादा भाजपच्या कारभाराला कंटाळले होते’ विकास लवांडे पुढे म्हणाले की, या सगळ्या परिस्थितीमुळे अजितदादा भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या कारभाराला पूर्णपणे कंटाळले होते. त्यामुळे ते महायुतीतून बाहेर पडणार होते, ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे. अतुला लोंढे काय म्हणाले? अतुल लोंढे यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून ताकदीने राजकीय लढा देऊन मुख्यमंत्री होण्याची त्यांची योजना होती. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे असे काहीसे नियोजन असल्याचे लोंढे यांनी सांगितले. अजित पवार यांच्या निधनानंतर अपेक्षित राजकीय घडामोड होऊ शकली नाही. मात्र, त्यापूर्वी त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिका आणि केलेल्या हालचालींकडे लक्ष दिल्यास महायुतीतून बाहेर पडण्याच्या शक्यतेला दुजोरा मिळतो, असे लोंढे यांचे म्हणणे आहे. ————– हेही वाचा.. मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या?:धमकावणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाचा बोजा आणि वसुलीसाठी लावण्यात आलेल्या तगाद्याला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सावंगा गुरव येथे घडली आहे. संदीप अवधूत करडे (रा. शिलोड) असे या शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे सावंगा गुरवसह शिलोड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या धक्कादायक घटनेची दखल घेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सविस्तर वाचा

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin