Sahar Shaikh News | ‘कैसा हराया’ फेम सहर शेख नॉटरिचेबल! ‘या’ कारणाने नगरसेवकपद जाऊ शकतं; वाचा काय आहे प्रकरण
Sahar Shaikh News | ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 मधील नगरसेविका सहर शेख (Sahar Sheikh) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ‘कैसा हराया’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेल्या सहर शेख यांचे नगरसेवकपद आता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख (Yunus Shaikh) हे दोघेही ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली आहे. मुंब्रा परिसरातून ते अचानक गायब झाल्याची चर्चा असून यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
सहर शेख यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत युनूस शेख यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या जात वैधता पडताळणी समितीकडून सुरू आहे. (Mumbra Corporator Issue)
या अहवालाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. जर समितीने प्रमाणपत्र अवैध ठरवले, तर सहर शेख यांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sahar Shaikh News | शेख कुटुंबीय ‘नॉट रिचेबल’; राजकीय चर्चांना उधाण :
प्रकरण गंभीर होत असताना शेख कुटुंबीयांनी पूर्णपणे गुप्तता पाळल्याचे दिसत आहे. सहर शेख आणि त्यांचे वडील दोघेही संपर्काबाहेर असल्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून विरोधक आक्रमक झाले आहेत. समितीचा अंतिम निर्णय काय येतो आणि त्यानुसार पुढील कारवाई काय होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
