![]()
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अन्नाचा त्याग केल्यामुळे तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार, तुपकरांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या किडनीवर झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना तातडीने उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे, मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, या भूमिकेवर तुपकर ठाम आहेत. अकोला-हैद्राबाद हायवे रोखला, टायर पेटवले
तुपकरांची प्रकृती खालावल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वाशिममध्ये शेतकरी आणि कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले. संतप्त आंदोलकांनी अकोला-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर उतरून रस्त्यावर टायर जाळले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मलकापुरात संताप; शेतकऱ्यांनी स्वतःचेच साहित्य जाळले
दुसरीकडे, सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत मलकापूर तालुक्यातील वाघुळ येथील शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. सरकारने शेतीचा वीज पुरवठा १२ तासांवरून ६ तासांवर आणल्याने पिके जळत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशाने विकत घेतलेले सिंचन साहित्य शेतातच पेटवून दिले. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान: संभाजीनगर-जालना, नाशिकसह राज्यभरात राजकीय प्रतिष्ठा पणाला; 6 आधीच बिनविरोध
राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला आहे. आता उर्वरित 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यात संपूर्ण राज्याचे लक्ष छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघाकडे लागले असून येथे भाजपचे सुहास शिरसाठ व ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट व अटीतटीची लढत होत आहे. वाचा लाइव्ह अपडेट्स..
शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा चौथा दिवस:प्रकृती खालावल्याने राज्यभरात संताप, महामार्गावर टायर जाळले
