Maharashtra Heatwave Alert | महाराष्ट्रात उष्णतेची लाट! ‘या’ 15 जिल्ह्यांना गंभीर इशारा

0
Sayali-Gfx-5.webp.webp


Maharashtra Heatwave Alert | राज्यात सध्या उन्हाचा प्रकोप तीव्र होत असून अनेक भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. 15 एप्रिल 2026 रोजीच्या हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढली असली तरी विदर्भात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अकोला येथे 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे यंदाच्या हंगामातीलच नव्हे तर देशातीलही सर्वाधिक तापमान ठरले आहे. अकोल्यानंतर अमरावती आणि वर्धा येथे 42 अंशांपर्यंत तापमान पोहोचले, तर चंद्रपूर, नागपूर, वाशिम आणि गडचिरोली येथेही 41 अंशांपेक्षा जास्त पारा नोंदवला गेला आहे. (Maharashtra Heatwave Alert)

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उष्णतेचा तडाखा कायम आहे. जळगाव, धुळे, सोलापूर आणि परभणी या शहरांमध्येही तापमान 41 अंशांच्या पुढे गेले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बिहार ते तामिळनाडू (Tamil Nadu) दरम्यान तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या उष्णतेत वाढ होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Heatwave Alert | कोकणात दमट उकाडा, प्रशासन सतर्क :

कोकण किनारपट्टीवर उष्णतेसोबत दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून उकाडा आणि आर्द्रतेमुळे त्रास वाढला आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आणि गरज असल्यासच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. (temperature rise India)

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) काही उपाययोजना लागू केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे (SOPs) जाहीर केल्याचे सांगितले.

लातूर, अमरावती (Amravati), यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर (Nagpur), वर्धा, चंद्रपूर, गोंदिया gondia), भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे (Dhule) आणि नांदेड या 15 जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

News title : Heatwave Alert Across Maharashtra

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks