[ads1]
परभणी (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई केली आहे. परभणी जिल्ह्यातील दैठणा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर विशेष पथकाने अचानक धाड टाकत २५ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत तब्बल १२ लाख ९६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई २९ ऑगस्ट २०२६ रोजी दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत परभणी–गंगाखेड रोडवरील आंबेटाकळी फाटा येथे करण्यात आली. येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अर्जुन मनोरंजन प्लेईंग कार्ड क्लबच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने कारवाईचा बडगा उगारला.पोलिसांच्या धाडीत ५३ हजार ५५० रुपये रोख, २० मोबाईल फोन, १ चारचाकी वाहन आणि तब्बल ११ मोटारसायकली असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड पडताच परिसरात एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान जुगारासोबत तंबाखूजन्य पदार्थ देखील आढळून आले. त्यामुळे दैठणा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६८/२०२६ अन्वये मुंबई जुगार कायदा तसेच सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा, २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोहेकॉ प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदिप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डीआयजी शहाजी उमाप यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले.
अवैध धंद्यांची माहिती असेल तर गप्प बसू नका!
नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी खबर हेल्पलाइन ९१५०१००१०० सुरू करण्यात आली आहे. आपल्या परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
#परभणी #नांदेड #पोलीस #शहाजीउमाप #जुगारअड्डा #पोलीसकारवाई #BreakingNews #MaharashtraNews #CrimeNews #ParbhaniNews #NandedNews
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad