Navnath Ban Slams Aditya Thackerays Leadership; Predicts UBT Struggles in 2029
![]()
मनपा निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी चांगले काम केले तरी सत्ता मिळवता आली नाही असे संजय राऊत सांगत आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेला चांगले काम केले तरी काही फायदा झाला नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंच्या अपयशावर राऊतांनी बोट ठेवले आहे. ते कसे अपयशी आहेत, त्यांच
.
नवनाथ बन म्हणाले की, मतदारसंघ वाढीमुळे देशात आग लागणार नाही. विरोधी पक्षांमध्ये आग लागलेली आहे. विरोधी पक्षांची अवस्था काय होणार हे येणाऱ्या 2029 च्या निवडणुकीच्या वेळी समजेल. तुमच्या बुडाखाली आग लागली आहे, कारण तुमच्याकडे इतके लोकंच नाही. 2024 च्या निवडणुकीत तुम्हाला उमेदवार मिळाले नाही. आता येणाऱ्या काळात उबाठाला उमेदवार मिळणार नाही याची चिंता राऊतांना आहे. तुमच्या पक्षात आग लागणार आहे.
ठाकरे VS राऊत कोण जिंकणार?
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांना कोणतीही कल्पना न देता आदित्य ठाकरे यांनी कार्याध्यक्ष होण्यासाठी रणनिती तयार केली आहे. आता यामध्ये राऊतांचा गट विजयी होणार की ठाकरेंचा हे पाहणं महत्त्वाचे आहे. आदित्य ठाकरेंच्या हाती सू गेली तर आपल्याला खासदारकी मिळणार नाही हे राऊतांना माहिती आहे. तर मुख्य प्रवक्ते पदही जाईल म्हणून ते आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. संजय राऊत उबाठाचे प्रवक्ते नसावे ही आदित्य ठाकरेंची इच्छा आहे.
आदित्य ठाकरेंना राऊतांचा विरोध
नवनाथ बन म्हणाले की, उबाठामध्ये आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील लढत आता थेट बघायला मिळत आहे. आज दिल्लीमध्ये बोलताना राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करणार असतील तर त्याबद्दल मला माहिती नाही. हे निर्णय पक्षामध्ये होतात, मग राऊत तुम्ही पक्षामध्ये नाहीत का? असा सवाल बन यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याची तयारी उबाठामध्ये सुरू आहे आणि संजय राऊत दिल्लीमध्ये बसून सांगताय की मला याबद्दल पत्रकारांकडून माहिती मिळते आहे. आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्यासाठी राऊतांचा गट कार्यरत आहेत. म्हणून त्यांच्याकडून आदित्य ठाकरे फिरत नाही अशा वावड्या पसरवल्या जातात. ते कार्याध्यक्ष होऊ नये ही राऊतांची इच्छा आहे, कारण त्यांना स्वत:ला पक्षाचे अध्यक्ष व्हायचे आहे. उद्धव ठाकरेंनंतरही धुरा आपल्याकडे यावा असे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे बन यांनी म्हटले आहे.
महिला आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार
नवनाथ बन म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकाला सर्व पक्षातील महिला पाठिंबा देत आहे त्यांचे आभार मानतो. महिलांना आरक्षण मिळाले पाहिजे. महिलांना विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण मिळावे यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. सर्वच जण या विधेयकाला पाठिंबा देत आहे, त्यांचे आभार मानतो. पण संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
