कल्याण – नगर महामार्गावर भीषण अपघात:ईको कार – सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक, 8 प्रवाशी जागीच ठार, 1 गंभीर
![]()
कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा एक भयंकर अपघात झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत तब्बल 8 प्रवाशी ठार झाले असून, 1 जण गंभीर जखमी झाला आहे. सध्या पोलिस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. तर जखमीला लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, कल्याण – नगर मार्गावर सोमवारी सकाळी एक ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात ईको कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यामुळे त्यातील 8 प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. ते जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबतचा आणखी 1 जण या अपघातात गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ती माहिती महामार्ग पोलिस व स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्वांनी कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना व जखमींना बाहेर काढले. या घटनेतील गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांकडून मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…
