न्यायालयात "क्लीन चिट', खासदार नीलेश लंकेंचा शनिचरणी "अभिषेक':राजकीय तसेच न्यायालयीन अशा दोन्ही आघाड्यांवर विजय

0
app_177598313869db5a22d628f_1008810311.jpg




प्रतिनिधी |सोनई राजकीय मैदानात गाजलेल्या विजयानंतर आता न्यायालयीन लढाईतही यश मिळाल्यानंतर खासदार नीलेश लंके यांनी शनिवारी रात्री शनिशिंगणापूर गाठले. शनी महाराजांच्या मूर्तीवर तैलाभिषेक करत त्यांनी ‘न्यायदेवते’च्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. . लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल करून लंके यांच्या निवडीला आव्हान दिले होते. मात्र बुधवारी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लंके यांची निवड कायम ठेवली. त्यामुळे राजकीय तसेच न्यायालयीन अशा दोन्ही आघाड्यांवर लंके यांचा विजय झाल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर येथे दर्शन घेताना लंके म्हणाले, शनी महाराजांवर माझी अपार श्रद्धा आहे. मी नियमित येथे दर्शनासाठी येत असतो. दरम्यान, देवस्थानातील कर्मचाऱ्यांना मागील सात महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याची माहिती मिळताच त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी देवस्थान प्रशासनाने तातडीने कर्मचाऱ्यांचे थकीत पगार जमा करावेत, अशी मागणी केली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आपलेही दिवस येतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. या प्रसंगी नगरसेवक योगीराज गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, कार्याध्यक्ष प्रा. सिताराम काकडे, जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाणे, उद्योजक अविनाश बनकर, गणेशराव गडाख आदी उपस्थित होते शनिमुर्तीस तैलाभिषेक करताना खा नीलेश लंके. छाया : राहुल राजळे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks