अमरावती जिल्ह्यात कमी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईसाठी ७३४ कोटी रुपयांचा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांत दुष्काळी स्थिती आहे. शासकीय निकषांनुसार शेतजमिनींचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर ३३ टक्क्यांच्या मर्यादेत पिकांच्या नुकसानीची मोजणी करून ७३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला. विभागीय आयुक्तांमार्फत तो शासनाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावातील निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वानखडे यांनी पत्रातून केली आहे. जून ते सप्टेंबर २०२६ या काळात अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, मोर्शी, तिवसा, वरुड, धारणी, चिखलदरा आणि चांदूर बाजार या तालुक्यांत ट्रिगर वन लागू झाल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळामुळे जिल्ह्यातील ५ लाख १८ हजार १७७ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यांच्या शेतीचे एकूण क्षेत्र ७ लाख ११ हजार ९६०.९५ हेक्टर आहे. शासनाच्या निकषांनुसार या शेतकऱ्यांना अंदाजे ७३४ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची गरज असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. वानखडे यांनी पत्रात म्हटले आहे की, खरीप हंगामात जिरायत, बागायत आणि फळपिकांचे नुकसान झाले. सरकार संपूर्ण नुकसानभरपाई देत नसल्याने, शासनाने ठरवलेल्या हेक्टर मर्यादेतील सर्वेक्षणानुसार ७३४ कोटी रुपयांची रक्कम निश्चित झाली आहे. हा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search