नांदगाव पेठेतील संगमेश्वर रस्त्यावर पाण्याच्या टाकीजवळ ऋषिकेश मुळे यांच्या गायीच्या गोठ्यात अजगर आढळला. सोमवारी, २ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोठ्यातील कुटारात अजगर दिसताच मुळे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक घाबरले. ऋषिकेश मुळे यांनी सर्पमित्रांना बोलावले. अजगराने नुकतीच मोठी शिकार गिळल्याने तो एका जागी सुस्त पडला होता. सर्पमित्रांच्या टीमने सावधपणे अजगराला कुटारातून बाहेर काढले. त्याला इजा न करता सुरक्षितपणे रेस्क्यू केले. या मोहिमेत सर्पमैत्रीण संघटना पाटील यांचाही सहभाग होता. सर्पमित्र शुभम वानखडे, चेतन वानखडे आणि मनोज हटवार यांनीही रेस्क्यूमध्ये मदत केली. अजगर किंवा साप आढळल्यास घाबरू नका आणि त्याला हाताळण्याचा प्रयत्न करू नका. सर्पमित्रांशी संपर्क साधा, असे संघटना पाटील यांनी सांगितले. त्या अमरावतीच्या सर्पमैत्रीण आहेत. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 12 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation ग्रामपंचायतींना अभियानाचे उद्दिष्ट ठरवले:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी घेतला आढावा; लोकसहभाग, श्रमदान आणि सुशासनावर भर अमरावतीत पीक नुकसानभरपाईसाठी 734 कोटींची मागणी:खासदार बळवंत वानखडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र