जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेला सुशासनासाठी तयार करा, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले. शासन निर्णयातील निकषांचे पालन करून सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करावे, असेही त्या म्हणाल्या. अभियानाबाबत नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा झाली. यात मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डीआरडीएचे प्रकल्प संचालक आणि सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ११ ऑक्टोबरच्या शासन निर्णयातील आठ घटकांवर कार्यशाळेत मार्गदर्शन आणि चर्चा झाली. यात सुशासन पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, योजनांचे अभिसरण, संस्था बळकटीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, तसेच लोकसहभाग आणि श्रमदान यांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या नियोजनाचे सादरीकरण केले. आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे, नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा देणे, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार कमी करून त्यांचे निर्मूलन करणे, तसेच माता व बालकांचे आरोग्य सुधारणे हे अभियानाचे उद्देश आहेत. ‘प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त’ या तत्त्वावर ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान राज्यात सुरू करण्यात आले आहे. सर्व ग्रामपंचायती आणि आरोग्य संस्थांनी यात सक्रिय सहभाग घेऊन काम करावे, असे आवाहन गुंडे यांनी केले. कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, अपर आयुक्त (विकास) शालिनी कडू आणि सहाय्यक आयुक्त (विकास) राजीव फडके उपस्थित होते. पीएमएवायचाही आढावा गुंडे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा (पीएमएवाय) तालुकानिहाय आढावा घेतला. उर्वरित घरकुलांची कामे लवकर पूर्ण करण्यास त्यांनी सांगितले. टंचाईच्या काळात चारा लागवड, नेपियर गवत लागवड, जलसंधारणाची कामे, उपजीविका आणि व्हिबीजी रामजीअंतर्गत कामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 12 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation फेरफार नोंदींतील अनियमिततेप्रकरणी तलाठी निलंबित:अमरावतीचे संतोष गणेशराव चपटे यांच्यावर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची कारवाई गायीच्या गोठ्यात अजगर आढळला:नांदगाव पेठेत सर्पमित्रांनी सुरक्षितपणे बाहेर काढला; संघटना पाटील यांचाही सहभाग