नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांची बदली सातारा अपर पोलीस अधिक्षक पदावर झाली. आज त्यांना सहकुटूंब पोलीस दलाच्यावतीने निरोप देण्यात आला. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, सौ.संस्कृती गुरव आणि गुरव कुटूंबातील दोन फुले सई आणि रुद्र यांची उपस्थिती होती. यांच्यासोबत पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर वैंजने, शाम पानेगावकर, किरण पोपळघट, प्रशांत शिंदे पोलीस निरिक्षक संतोष तांबे, अशोक जाधव, रामदास शेंडगे, राजेश पुरी, महादेव मांजरमकर, सिध्देश्र्वर कैलासे, नागनाथ आयलाने, शामसुंदर टाक, अतुल भोसले, मनपातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा सुरज गुरव बालमित्र धनराज पांडे यांचीही उपस्थिती होती. सोबतच आरसीपी पथकातील महिला पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस निरिक्षक शेख रियाज यांनी केले.याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांसह अनेकांनी सुरज गुरव यांच्याबद्दल आपल्या अनुभवांना सर्वांसमक्ष मांडले. सुरज गुरव यांनी सुध्दा आपल्या सत्काराचे उत्तर देतांना भरपूर बाबी सांगितल्या. परंतू नांदेडचा उल्लेख करतांना तसेच नांदेडच्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांचा उल्लेख करतांना त्यांना अश्रु अनावर झाले. वास्तव न्युज लाईव्हचे प्रतिनिधी सुध्दा त्या कार्यक्रमात हजर होते. सर्वांच्या भावना एकत्रित करून वाचकांसाठी त्या कार्यक्रमाचा सार सादर करत आहोत. प्रशासकीय मर्यादा ओलांडून अनोपचारीक संबंध तयार करणारे व्यक्तीमत्व म्हणजे सुरज गुरव. आपल्या कनिष्ठ अधिकार्यांना कधीच रागवणार नाहीत. प्रत्येकाला आलेली समस्या आपण सोडवू असा धीर देणारे व्यक्तीमत्व म्हणजे सुरज गुरव. आपल्या शारिरीक फिटनेसबद्दल नेहमी लक्ष ठेवणारे व्यक्ती.आपल्या संपर्कातील सर्वांना शारिरीक दृष्ट्या फिट राहा असा संदेश देणारे व्यक्तीमत्व म्हणजे सुरज गुरव. आपल्या वरिष्ठांशी कधी पंगा घ्यायचा नाही असा सल्ला उपस्थित अधिकार्यांना देणारे व्यक्तीमत्व म्हणजे सुरज गुरव. सुरज गुरव यांच्या नांदेडहून जाण्याने एक पोकळी निर्माण होणार आहे. ती पोकळी भरून काढतांना नांदेडमधील लोकांना बराच काळ लागणार आहे. पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या मते माझा उजवा हात कमी झाला आहे. नांदेडच्या नंदगिरी किल्याला त्यांनी दिलेले नवीन रुप नांदेडकर लवकर विसरणार नाहीत. सुरज गुरव यांनी आपले जीवन जगतांना कोणतीही बाब करण्याचे शिल्लक राहू नये हा संदेश सर्वांना दिला आहे. यात काही महिन्यापुर्वी त्यांनी 100 किलो मिटर सायकलींग केल्याचा किस्सा आठवला. अनेकांना त्यांनी जीममध्ये येण्यास सांगितले. परंतू ऐकणार्यांनी त्यांना कधी प्रतिसाद दिला नाही. या घटनेतील महत्वाचा मुद्दा असा आहे की, जे आपल्याला होणार नाही त्याचा सल्ला सुरज गुरव देत आहेत. मग आपण त्या भानगडीत कशाला जायचे. सुरज गुरव यांनी सेवानिवृत्तीनंतर सुध्दा काय करायचे आहे याचे नियोजन करून ठेवलेले आहे. यातून सर्वांना हा धड्डा मिळतो की, उद्याचे जीवन कोणाला माहित असा जो विचारआहे तो किती चुकीचा आहे. आपण नियोजन 20 वर्षापुढेचे सुध्दा करून ठेवू शकतो आणि तो आपल्या जगण्याचा आधार बनू शकतो. हा मुद्दा दिसतो. आपल्या सत्काराला उत्तर देतांना सुरज गुरव म्हणाले मला रजा देणारे अधिकारी आवडतात आणि पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी मला ती संधी पुर्णपणे उपलब्ध करून दिली आहे. मी जगात कोणाला घाबरलो नाही, अनेकांच्या सेवा केल्या आहेत, अनेक जण माझ्या समोर येण्यास घाबरतात. पण मी माझ्या पत्नी संस्कृती समोर घाबरतो हे सत्य सुध्दा सांगून टाकले. पण बोलतांना त्यांना अश्रु अनावर झाले आणि मग पुढे ते बोलले नाहीत. एकंदरीत भावनिक आणि प्रशासकीय अशा दुहेरी संगमात हा निरोप समारंभ पार पडला. सुरज गुरव यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत. माझे गडप्रेम आणि विद्यार्थी धर्म वास्तव न्युज लाईव्हला त्यांच्या गडप्रेम पुस्तकावर पुस्तक परिक्षण लिहिण्याची संधी मिळाली होती.परिक्षण लिहिण्यासाठी पुस्तक वाचावे लागते आणि आम्ही जेंव्हा ते पुस्तक वाचले तेंव्हा कोणत्या गडावरची कपार कशी वळलेली आहे, कोणत्या गडावरची कोणती पायरी कशा पध्दतीने दिसते, कोणत्या गडावरचा खंदक आम्हीच पार करत आहोत असे वाटत होते. कोणत्या गडावरील गुप्त मार्ग कसा आहे ज्यातून आम्ही चालत आहोत असे वाटते होते. सुरज गुरव यांना पुस्तक लिखानासाठी कधी वेळ मिळाला असेल हे समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या दैनंदिनीचा अभ्यास करावा लागेल. त्यांचे अजून दोन पुस्तके परवानगीच्या परिस्थितीत आहेत. वास्तव न्युज लाईव्हला संधी मिळाली तर त्याही पुस्तकांचे परिक्षण लिहिण्याचा प्रयत्न केला जाईल. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 5 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation नांदेड जिल्ह्यात बँक ग्राहकांची फसवणूक; मुदखेडमध्ये २.४३ लाखांचा अपहार, नायगावमध्ये एटीएम कार्ड बदलून १४ हजार लंपास! स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर वजीराबाद पोलिसांचा छापा!