निलज शिवारात नदीपात्रातून इंजिन बोटीच्या साहाय्याने सुरू होता वाळू उपसा; तीन टिप्पर, जेसीबी, ट्रॅक्टरसह १० ब्रास वाळू जप्त परभणी (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निलज शिवारात असलेल्या वाळू घाटावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ८७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परभणी जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार २ नोव्हेंबर २०२६ रोजी पथकाने निलज शिवारातील वाळू घाटावर धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान नदीपात्रातून इंजिन बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा करून ती नदीकिनारी आणली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन टिप्पर, एक जेसीबी, एक ट्रॅक्टर, चाळणी तसेच नदीपात्रातून काढून साठवून ठेवलेली १० ब्रास वाळू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ८७ लाख ७५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या विशेष मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. या पथकाने केलेल्या कारवाईबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले. अवैध व्यवसायांची माहिती ‘खबर’ हेल्पलाइनवर द्या नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने खबर हेल्पलाइन सुरू केली आहे. ९१५०१००१०० हा या हेल्पलाइनचा संपर्क क्रमांक आहे. परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी या क्रमांकावर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Post Views: 206 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 6 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation शेतकरी चंद्रकांत शिंदे मृत्यू प्रकरणाचा तपास सुरूच; दोघांची कोठडी ४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली वाहतूक शाखेत दिवाळी आणि मोदकांचा जोरदार वापर – VastavNEWSLive.com