नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील उड्डाणपुलाजवळील केएफ इंटरप्राईजेस या फायनान्स कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळलेल्या प्रकरणात आज चार आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपली. या चारही आरोपींना पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी भाऊसाहेब मोरे यांच्या न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने हरप्रितसिंघ उर्फ मंटू नरेंद्रसिंघ मेजर आणि सतपालसिंघ किशनसिंघ खालसा या दोघांची पोलीस कोठडी ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवली, तर अन्य दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. २४ ऑक्टोबर रोजी शहरातील हिंगोली उड्डाणपुलाजवळ असलेल्या केएफ इंटरप्राईजेस या फायनान्स कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासादरम्यान एकूण दहा जणांना अटक केल्याची माहिती आहे. त्यापैकी सहा आरोपी यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत आहेत. आज पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या आरोपींमध्ये शेख अहमद उर्फ अस्लम मोहम्मद बशीर (२३), शेख शोएब शेख महेमुद (२१), केएफ इंटरप्राईजेसचे अध्यक्ष हरप्रितसिंघ उर्फ मंटू नरेंद्रसिंघ मेजर (४०) आणि सतपालसिंघ किशनसिंघ खालसा (४७) यांचा समावेश आहे. विशेष तपास पथकाचे अधिकारी रामेश्वर व्येंजने व त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी या चौघांना न्यायालयात हजर केले. तपासाच्या पुढील प्रगतीसाठी पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने हरप्रितसिंघ उर्फ मंटू नरेंद्रसिंघ मेजर आणि सतपालसिंघ किशनसिंघ खालसा या दोघांची पोलीस कोठडी दोन दिवसांसाठी, म्हणजेच ४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली. तर शेख अहमद उर्फ अस्लम मोहम्मद बशीर आणि शेख शोएब शेख महेमुद या दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पोलिसांनी अजून नऊ आरोपी पाहिजे आहेत असे न्यायालयात सादर करण्यात आले आहे. त्यांची नावे बसंत कौर उर्फ जग्गू दीदी उर्फ मावशी अमरसिंघ गल्लीवाले,माया मॅडम,शुभम उर्फ सुभाष भगवान कांबळे, सलमान, मोबिनभाई, मझहरभाई,रियाजभाई,केतन जोंधळे, मुजाहिद अशी आहेत. म्हणजे आज पर्यंतच्या तपासा प्रमाणे या शेतकरी हत्या प्रकरणात १९ आरोपी नक्कीच आहेत. सॊबतचा केएफ च्या खऱ्या भागीदारीचा शोध घेणे आहे आणि त्यात भागीदारीत वर्दीधारी कोण आहे ते सुद्धा शोधणे आहे. Post Views: 315 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 8 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation मुखेड पोलिसांची धडक कारवाई; कत्तलीसाठी जाणाऱ्या सात गोवंश जनावरांची सुटका! परभणीत अवैध वाळू उपशावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाचा छापा; ८७.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त