पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सिग्नेचर पार्क या उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका 33 वर्षीय महिलेने आपल्या 6 वर्षीय मुलासह इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. शुक्रवार, 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एकता मनोज बांगड आणि माधव मनोज बांगड अशी या मृत माय-लेकाची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आई आणि मुलाने 18 व्या मजल्यावरून उडी मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. एकता यांचे पती मनोज हे येरवडा येथील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे असून गेल्या दोन वर्षांपासून या सोसायटीत वास्तव्याला होते. सुसाईड नोटमध्ये पतीबद्दल भावना पोलिसांना घटनास्थळी एकता यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सात ते आठ पानांची सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी पती मनोज यांच्याविषयी नितांत प्रेम व्यक्त केले आहे. आपल्या मृत्यूनंतर पतीने दुसरे लग्न करून नव्याने संसार थाटावा आणि आयुष्याला नवी सुरुवात करावी, अशी भावनिक इच्छा त्यांनी या चिठ्ठीत व्यक्त केली आहे. मुलाच्या काळजीपोटी टोकाचे पाऊल या चिठ्ठीत एकता यांनी मुलाला सोबत का नेले, याचेही कारण स्पष्ट केले आहे. आपल्या मृत्यूनंतर मुलगा वारंवार आईची आठवण काढेल आणि त्याला माझ्या अनुपस्थितीत जुळवून घेणे कठीण जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. शिवाय, लहान मूल सोबत असल्यास पतीला दुसरे लग्न करताना अडचणी येऊ शकतात, असाही विचार त्यांनी चिठ्ठीत मांडला आहे, ज्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मणक्याच्या आजाराचा त्रास एकता या गेल्या अनेक वर्षांपासून मणक्याच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. अनेक रुग्णालयांमध्ये उपचार घेऊनही त्यांच्या या आजाराचे नेमके निदान होत नव्हते आणि त्यांना असह्य त्रास सहन करावा लागत होता. याच शारीरिक वेदनांना कंटाळून त्यांनी हे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, एकता या आपला मुलगा माधव याला सोबत घेऊन लिफ्टने 18 व्या मजल्यावर जाताना स्पष्टपणे दिसत आहेत. 18 व्या मजल्यावरील गॅलरीजवळ दोघांच्याही चपला आढळून आल्या आहेत. यावरून एकता यांनीच मुलासह उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. वाकड पोलिसांकडून पुढील तपास सुरू सध्या या प्रकरणाची वाकड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिस सुसाईड नोटमधील मजकुराची आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल पडताळणी करत आहेत. या हृदयद्रावक घटनेचा पुढील तपास वाकड पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 6 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation राज ठाकरेंच्या नातीचं बारसं:अमित-मिताली ठाकरेंच्या लेकीचं नाव ठेवलं 'अहिल्या'; शिवतीर्थावर आनंदाचे वातावरण