काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खरी लढाई ही भारत आणि संविधानासोबत आहे. त्यामुळेच आपल्याला त्यांच्याविरोधात मैदानात उतरावे लागले आहे. याचा इतिहास पाहिला तर, 1975 मध्ये दिवंगत इंदिरा गांधी यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली होती, तेव्हा न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द ठरवली होती. आज आम्हाला लोकशाहीचे धडे देणाऱ्या काँग्रेसने इंदिरा गांधींच्या कार्यकाळात काय झाले, याचा विचार केला पाहिजे. त्यावेळी संविधानाची मोडतोड करत न्यायालय आणि लोकशाहीला संपवण्याचे काम काँग्रेसने केले. आज वोट चोरीचा आरोप करणाऱ्या याच लोकांनी प्रत्यक्षात संविधान चोरी केली आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाण्यात भाजपच्या लोकतंत्र बचाव पदयात्रेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता इंदिरा गांधींचे नातू तेच जुने राजकारण घेऊन पुन्हा मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी कायम परदेशात फिरत असतात, ते कशासाठी जातात? भारताला नेहमी पाण्यात पाहण्याचे काम चीन करत असतो. मग राहुल गांधींच्या पक्षाला आणि त्यांच्या ट्रस्टला चीनकडून डोनेशन का मिळत आहे? चीनच्या पैशावर भारतामध्ये अराजकता पसरवण्याकरिताच काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. लाल पुस्तकाचा मुखवटा अन् नेपाळ-बांगलादेश पॅटर्न देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या एक नवीन ‘लाल पुस्तक’ आणले गेले आहे. हे लाल संविधान हा केवळ त्यांचा एक मुखवटा आहे. याच लाल पुस्तકાचा वापर करून नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशची अवस्था बदलण्यात आली आणि आता तीच रणनीती भारतात राबवली जात आहे. हातात लाल संविधान घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने निर्माण केलेल्या एक-एक संस्थांना बदनाम करण्याचे षडयंत्र हे लोक रचत आहेत. सुप्रीम कोर्टावर मोर्चे नेणे हीच अराजकता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारताच्या संविधानाने निर्माण केलेल्या सर्वोच्च न्यायालयावर हे लोक मोर्चे नेत आहेत, हीच खरी अराजकता आहे. सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढले जात असताना ‘संविधान वाचवा’ असे म्हणणारे गप्प का आहेत? यांना भारताची लोकशाही आणि संविधान नको आहे, त्यांना देशात अराजकता निर्माण करायची आहे. जनतेने त्यांचे हे षडयंत्र समजून घेतले पाहिजे. चीनची ‘लाल व्यवस्था’ भारतात आणण्यासाठीच हा सर्व घाट घातला जात आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावरही उतरू शकतो. काँग्रेसनेच गोठवले होते नागरिकांचे मूलभूत अधिकार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत भाषण करताना सांगितले होते की, या संविधानात सर्वात महत्त्वाचे काही असेल तर ते भारतीय नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार आहेत, जे देशात समानता आणतात. मात्र, याच काँग्रेसने 1976 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मूलभूत अधिकार गोठवून टाकले होते आणि मूलभूत अधिकारांसाठी कोणालाही सुप्रीम कोर्टात जाता येणार नाही, अशी दडपशाही चालवली होती. पुढे 1977 मध्ये जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर हे अधिकार देशवासीयांना पुन्हा परत देण्यात आले. हे ही वृत्त वाचा मोदींबद्दल अभद्र भाषा वापरणारे खड्ड्यात गेले:बाळासाहेब असते तर मोदी-शहांना शाब्बासकी दिली असती, भाजपच्या लोकतंत्र बचाव यात्रेतून शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ज्या ज्या वेळी विरोधकांनी अभद्र भाषा वापरली, त्या त्या वेळी विरोधक खड्ड्यात गेले आहेत. देशातील जनतेला हे वर्तन अजिबात पटत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे कलम 370 हटवण्याचे आणि भव्य राम मंदिर उभारण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पूर्ण केले. आज जर बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या ‘लोकतंत्र बचाव यात्रे’त ते बोलत होते. वाचा सविस्तर

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search