दोन पत्रकारांविरोधात खोट्या तक्रारी करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप; मोगलीची पत्रकार वर्तुळात पुन्हा चर्चा

नांदेड (प्रतिनिधी)- पत्रकारितेच्या क्षेत्रात दुसऱ्यांच्या विरोधात कुरघोड्या करण्याचे राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, याचा प्रत्यय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेल्या एका प्रकारामुळे पुन्हा एकदा आला. दोन वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींविरोधात त्यांच्या कार्यालयात आणि वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी करण्यासाठी एका जुन्या पत्रकारावर दबाव आणल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारात सूत्रधार म्हणून चर्चेत असलेल्या ‘मोगली’ला अखेर एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने चारचौघांतच जाब विचारल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमधील एका जुन्या पत्रकाराला दोन वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींविरोधात त्यांच्या कार्यालयात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यास सांगितले जात होते. विशेष म्हणजे, या तक्रारींच्या सत्यतेपेक्षा संबंधित पत्रकारांची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू असल्याचा आरोप केला जात आहे. ‘मोगली’, आणि त्याचा काका रुकम्या डाकू यांच्याकडून संबंधित पत्रकारावर दबाव आणला जात होता.

मात्र, संबंधित पत्रकाराने या दबावाला बळी न पडता वेगळाच मार्ग स्वीकारला. ज्यांच्या विरोधात तक्रारी करण्यास सांगितले जात होते, त्याच पत्रकाराला त्याने संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे पडद्यामागून सुरू असलेला  डाव उघडकीस आला.

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संबंधित वृत्तवाहिनीचा पत्रकार आणि मोगली आमनेसामने आले. यावेळी परिसरात अन्य पत्रकारही उपस्थित होते. संबंधित पत्रकाराने मोगलीला थेट प्रश्न विचारत खोट्या तक्रारींच्या कथित कारस्थानाचा जाब मागितला. चारचौघांत झालेल्या या जाबसवालामुळे मोगलीची चांगलीच कोंडी झाल्याची चर्चा पत्रकार वर्तुळात रंगली आहे.

दुसऱ्यांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी पत्रकारांचाच वापर करायचा, वरिष्ठांकडे बदनामीचे डाव खेळायचे आणि स्वतः मात्र पडद्यामागे राहायचे, अशी कार्यपद्धती किती काळ चालणार? पत्रकारिता ही समाजाचा आरसा असते की एकमेकांची उणीदुणी काढण्याचे व्यासपीठ, असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

नांदेडच्या पत्रकारिता वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, मोगलीची पुन्हा एकदा चारचौघांत चर्चा झाली आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी जाब विचारला गेल्यानंतरही संबंधित मंडळी आत्मपरीक्षण करणार की पुन्हा नव्या कुरघोड्यांच्या तयारीला लागणार, हा खरा प्रश्न आहे.

पत्रकारितेच्या नावाखाली दबाव, खोट्या तक्रारी आणि बदनामीचे राजकारण करणाऱ्यांना आता पत्रकारितेच्या विश्वासार्हतेचा तरी विचार करावा लागणार आहे.


Post Views: 117










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search