Today Gold Price | सोन्याच्या दरात घसरण! चांदीने भाव खाल्ला; पाहा आजचे ताजे दर
Today Gold Price | सोन्या-चांदीच्या किमतीत दररोज चढ-उतार होत असतात. त्यामुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांसाठी आजची किंमत जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. आज (9 एप्रिल 2026) जागतिक बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर चांदीच्या किमतीत वाढ नोंदवली गेली आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवरही दिसून आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचेही लक्ष आजच्या किमतींकडे लागले आहे.
आज भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 15,148 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. कालच्या तुलनेत यात 234 रुपयांची घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा दर 13,885 रुपये प्रति ग्रॅम असून यात 215 रुपयांची घट झाली आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 11,361 रुपये प्रति ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. (Gold Rate 9 April 2026)
१० ग्रॅमचा विचार केला तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,51,480 रुपये इतकी आहे, जी कालच्या तुलनेत 2,340 रुपयांनी कमी झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम दर 1,38,850 रुपये असून त्यात 2,150 रुपयांची घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर आज सोन्याचा दर 1,50,647 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून सुरू झाला. सुरुवातीला घसरण झाल्यानंतर खरेदी वाढल्यामुळे किंमत पुन्हा 1,51,000 रुपयांपेक्षा जास्त झाली.
Today Gold Price | प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर :
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,160 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,010 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,830 रुपये आहे. (Today Gold Price)
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,41,060 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,53,880 रुपये आहे. चेन्नईमध्ये सोन्याचा दर तुलनेने जास्त असून 22 कॅरेटसाठी 1,42,010 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 1,54,920 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
चांदीच्या किमतीत वाढ :
सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे. आज सकाळी चांदीचा दर 2,60,100 रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला. काल दिल्लीतील सराफा बाजारात चांदीची किंमत 2,51,000 रुपये प्रति किलो होती. त्यामुळे एका दिवसात सुमारे 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Today Silver Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 77.33 डॉलर्स प्रति औंस इतका आहे. विशेष म्हणजे यावर्षी जानेवारी महिन्यात भारतात चांदीची किंमत 4 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली होती. त्यामुळे पुढील काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
