अमरावती जिल्ह्यातील भातकुली महसूल विभागाने एका आठवड्यात अवैध रेती वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. या कारवाईत अंदाजे २ ब्रास रेतीसह सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने मोहीम सुरू केली आहे. पथकाने वाहनांवर लक्ष ठेवून तपासणी केली. यावेळी परवान्याशिवाय रेती वाहतूक होत असल्याचे आढळले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे व महेश घाटुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भातकुलीचे तहसीलदार अक्षय मांडवे यांनी ही कारवाई केली. दोन वाहनांसह अंदाजे २ ब्रास रेती जप्त करण्यात आली. या कारवाईत नायब तहसीलदार चंद्रकांत मेश्राम, मंडळ अधिकारी संतोष धुर्वे आणि ग्राम महसूल अधिकारी संतोषसिंग गिल सहभागी झाले. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधातील मोहीम पुढेही तीव्र केली जाईल, असे महसूल विभागाने सांगितले. अशा गैरप्रकारांत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागाने दिला.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search