हदगाव (प्रतिनिधी) – दिघी,पुणे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर, पुणे पोलिसांच्या पथकाचा मुक्काम असताना आरोपी लॉजच्या खिडकीतून पळून गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दांडिया कार्यक्रमातून बेपत्ता झाली होती अल्पवयीन मुलगी मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोळगाव येथील मूळ रहिवासी असलेली १७ वर्षीय मुलगी पुणे जिल्ह्यातील दिघी परिसरातील भारतमातानगर येथे नातेवाईकांकडे राहत होती. गत १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री दांडियाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेली ही मुलगी उशिरापर्यंत घरी परतली नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने, अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केल्याच्या संशयावरून तिचे नातेवाईक प्रकाश भालेराव यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ अन्वये १९ ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. संशयिताला ताब्यात घेतले, मात्र वाहनाअभावी लॉजमध्ये मुक्काम या प्रकरणाचा तपास करत दिघी पोलिसांचे पथक हदगाव तालुक्यातील कोळगाव येथे पोहोचले. तेथे स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आणि तामसा पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत त्याची नोंद केली. परंतु, पुण्याकडे परतण्यासाठी वेळेवर सार्वजनिक वाहन उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी रात्री हदगाव येथेच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पथक हदगाव शहरातील बसस्थानकासमोरील एका लॉजमध्ये मुक्कामासाठी थांबले. पोलीस गाढ झोपेत अन् संशयिताचे पलायन लॉजमध्ये मुक्कामादरम्यान रात्रीच्या वेळी पोलीस अधिकारी झोपेत असताना, संशयिताने चाणाक्षपणे लॉजच्या पाठीमागील खिडकीतून पळ काढला. विशेष म्हणजे, पुणे पोलिसांच्या या पथकाने हदगाव येथे मुक्काम करताना स्थानिक हदगाव पोलीस ठाण्यात कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोंद दिलेली नव्हती,असे सांगण्यात आले. पण आरोपी पळून गेल्यावर मात्र हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. Post Views: 170 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 12 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation रविवारी नांदेडमध्ये डॉ. विलासराज भद्रे यांना श्रद्धांजली सभा नांदेड पोलीस दलातील ५ अधिकारी-अंमलदारांना सन्मानपूर्वक निरोप