नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या कुबेर फल इंटरप्राईजेस या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळला आणि राज्यभर खळबळ माजली. पण नांदेडमध्ये वेगवेगळ्या नवीन चर्चा ऐकायला येत आहे की, त्या कुबेर फल कंपनीमध्ये काही वर्दीधारी लोकांचे पैसे गुंतलेले आहेत. सध्या कुबेर फल कंपनीचे अध्यक्ष आणि सचिव पोलीस कोठडीत आहेत. त्यांची पोलीस कोठडी 2 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्या अगोदर हे वर्दीधारी कोण हे जर विशेष तपास पथकाने शोधले तर चुकीच्या कामांमध्ये वर्दीधारी मंडळी आपल्या वर्दीचा उपयोग कशा पध्दतीने करतात हे सुध्दा समोर येईल.

कुबेर फल कंपनीमध्ये काही वर्दीधारी लोकांचे पैसे गुंतवलेले आहेत अशी चर्चा नांदेडमध्ये जोरदारपणे होत आहे. पण ही वर्दी नेमकी कोणती याचा अंदाज बांधण्यात चर्चा करणारे असमर्थ आहेत. जर या कुबेर कंपनीमधील खात्यांची तपासणी केली तर ज्या लोकांनी पैसे गुंतविले आहेत. त्यांची नावे पुढे येतील. त्यात कोण्या वर्दीधारी माणसाच्या कुटूंबियांचे नाव असेल, नातलगाचे नाव असेल, मित्राचे नाव असेल असे असेल तर तो वर्दीधारीच त्या रक्कमेचा मुळ गुंतवणूकदार आहे असे मानले जायला हवे.

विशेष तपास पथकातील लोकांसमोर हे मोठे आव्हान आहे की, कोण आहे तो वर्दीधारी नांदेड जिल्ह्याचाच आहे की, नांदेड जिल्ह्याचा बाहेरचा आहे, त्याची नियुक्ती नांदेडमध्ये आहे की, बाहेरच्या जिल्ह्यात आहे हे सुध्दा समोर येईल. हे समोर येणे यासाठी आवश्यक आहे की, ज्या पध्दतीने शेतकऱ्याची हत्या करण्यात आली अणि जेवढ्या पैशांसाठी करण्यात आली तो अत्यंत शुल्लक प्रकार आहे. मृत्यूदंड देण्या इतप कुबेर फल कंपनीची हिम्मत कशी झाली. याचा विचार केलीा तर त्या मागेसुध्दा वर्दीधारी व्यक्तीचा प्रभाव असेल असे म्हटले तर चुक ठरणार नाही.

आज नांदेड जिल्ह्यातील हा शेतकरी हत्या प्रकार राज्यभर गाजला आहे आणि या मागे जर कोणी वर्दीधारी असेल तर तो लाजिरवाणा प्रकार आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणाच्या अत्यंत मुळाशी जाऊन हा वर्दीधारी कोण हे कायद्यासमोर आणि समाजासमोर आणण्याची गरज व्यक्त होत आहे. या कुबेर फलच्या कार्यालयात अनेक वर्दीधारी लोकांचे फोटो लावलेले होते. मग शेतकऱ्याचा मृत्यू घडल्यानंतर ते फोटो का काढण्यात आले याचाही शोध विशेष तपास पथकाने करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.


Post Views: 83










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search