Parth Pawars Pink Jacket Style at Rajya Sabha Oath Mirrors Ajit Pawar
![]()
पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार राज्यसभेतील प्रवेशावर चर्चा सुरू होती. त्यांच्या सोबतच्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेले
.
या सोहळ्यात मात्र सर्वाधिक लक्ष वेधले ते त्यांच्या पेहरावाने. पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शैलीतील गुलाबी जॅकेट परिधान केले होते. अजित पवार यांचा खास ओळख बनलेला हा पेहराव पुन्हा एकदा पाहायला मिळाल्याने अनेकांच्या भावना दाटून आल्या. त्यांच्या आवाजात आणि देहबोलीतही काही प्रमाणात अजित पवारांची छटा जाणवत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत पार्थ पवारांच्या शपथविधीला अधिकच भावनिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहिले जात होते.
दरम्यान, पार्थ पवारांच्या या नव्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शपथविधी सोहळ्यातील त्यांचा साधा पण प्रभावी अंदाज आणि अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देणारा पेहराव यामुळे हा क्षण अनेकांसाठी विशेष ठरला.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दिली शपथ
पार्थ पवार यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी पार्थ यांना शपथ दिली. यावेळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि भाजपचे नेते जे. पी. नड्डा यांची उपस्थिती होती.
