730-x-548-new-2026-04-09t120625528_1775716616.jpg



राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असताना काँग्रेस पक्ष माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ब

.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार आज दुपारपर्यंत आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. काल प्रदेशाध्यक्षांसोबत पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत अनेक नेत्यांनी माघार घेण्याच्या बाजूने भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.

या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी मागील काही दिवसांत विविध स्तरांवर चर्चा, बैठका आणि संपर्क सुरू होता. अखेर या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्षांकडून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दुपारपर्यंत केंद्रीय नेतृत्वाची परवानगी मिळाल्यास काँग्रेस अधिकृतपणे उमेदवारी मागे घेईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय चित्रात मोठा बदल होण्याची शक्यता असून, आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संदर्भातील खालील बातम्या देखील वाचा….

शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला:बारामतीची जागा अपघाताने रिक्त झाली, निवडणूक बिनविरोध व्हावी; शेवटच्या दिवशी निर्णायक क्षण

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. पूर्ण बातमी वाचा….

रोहित पवारांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी बंद दाराआड चर्चा:बारामतीत काँग्रेस ठाम, शेवटच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed