चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (३० ऑक्टोबर) एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. चिमूर तालुक्यातील उरकुडपार येथील शेतकरी सदाशिव चिरकुटा खडसंग (५५) हे पत्नीसह शेतात गेले होते. वाघाने त्यांना घनदाट जंगलात फरफटत घेऊन गेला होता. या हल्ल्यात सदाशिव यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील धुमणखेडा येथे घडली. पत्रु रामाजी मेश्राम (७५) हे दुपारी शेतात धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. शोधादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ त्यांचा क्षतविक्षत मृतदेह सापडला. विशेष म्हणजे, सिंदेवाही तालुक्यात अवघ्या एका आठवड्यातील वाघाच्या हल्ल्यातील हा तिसरा तर चंद्रपूर जिल्ह्यातील ३८ वा बळी ठरला आहे. तिसरी घटना पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम वनकक्ष क्रमांक ४३६ मध्ये घडली. गायी चारण्यासाठी गेलेले राजेश्वर बिजा सिडाम (६०) यांच्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search