शेतकरी आत्महत्यांवरून केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून चौफेर कोंडी झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी अखेर नमती भूमिका घेतली आहे. “माझ . दरम्यान, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तुमच्या संभाव्य निलंबनाचा प्रस्ताव ठेवला आहे का आणि तुमच्यावर कठोर कारवाई होणार का, असा थेट सवाल पत्रकारांनी विचारला असता गायकवाड यांनी त्यावर केवळ “नो कॉमेंट्स” म्हणत अधिक भाष्य करणे पूर्णपणे टाळले. शेतकऱ्यांसाठी स्वतःचे प्लॉट विकले, मी शेतकऱ्यांचा अपमान कसा करेन? स्वतःची शेतकरी पार्श्वभूमी सांगत गायकवाड यांनी आपल्या कामांचा पाढा वाचला. “गेल्या 40 ते 42 वर्षांपासून मी शेतकरी म्हणून आणि शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहे. माझे वडील लोकांच्या शेतात मजुरी करायचे, त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख मी जवळून पाहिले आहे.” संकटकाळात प्लॉट विकून मदत “शेतकऱ्यांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आणि संवेदनशीलता आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मी माझे स्वतःचे वैयक्तिक प्लॉट विकले आहेत. कोणाचे शेत जळाले तर त्याला आर्थिक मदत केली, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना 6-6 महिने पुरेल इतका किराणा भरून दिला आणि तब्बल 55 शेतकऱ्यांना स्वतः पक्की घरे बांधून दिली आहेत. त्यामुळे मी अन्नदात्याच्या विरोधात बोलेन, हा विचारही मनात येऊ शकत नाही.” माझ्याच कुटुंबातील एका तरुणाने आत्महत्या केली, त्या दुःखातून ते वक्तव्य आले! वादग्रस्त विधानामागचा घटनाक्रम सांगताना आमदार म्हणाले, “अवघ्या 8 ते 10 दिवसांपूर्वी माझ्याच जवळच्या कुटुंबातील एका तरुणाने आत्महत्या केली. आजकालची तरुण पिढी गांजा, चरस अशा विविध प्रकारच्या नशेत बेभान होते किंवा प्रेमभंगाच्या नैराश्यातून आई-वडील, पत्नी आणि लहान मुलांचा विचार न करता जीवन संपवते. अशा वेळी त्या कुटुंबाची जी भयावह अवस्था होते, त्या संतापातून आणि काळजीपोटी मी तरुणांना उद्देशून बोललो होतो.” विपर्यास करून बदनामीचा डाव “माझ्या या विधानाचा संबंध शेतकऱ्यांशी जोडून त्याचा विपर्यास करण्यात आला. मी शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नका असे कधीही बोललेलो नाही. परंतु, जर या विपर्यासामुळे महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याला अथवा पक्षाला यातना झाल्या असतील, तर मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करून हात जोडून माफी मागतो.” निलंबनाची कारवाई होणार का?; गायकवाड म्हणाले— नो कॉमेंट्स! पत्रकार परिषदेत कारवाईच्या मुद्द्यावरून मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. ‘शेतकरीविरोधी विधानामुळे पक्षाची प्रतिमा डागाळल्याने एकनाथ शिंदे यांनी तुमच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत का?’ असा थेट प्रश्न विचारताच आमदार गायकवाड निरुत्तर झाले. त्यांनी “या विषयावर मला काही बोलायचे नाही, नो कॉमेंट्स” असे सांगत हात जोडले आणि विषय तिथेच थांबवण्याचा प्रयत्न केला. महायुतीत 4-5 दिवस नाराजी राहील, पण सरकार भक्कम विधानपरिषदेच्या निकालांनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर त्यांनी मत मांडले. “निवडणुकीत स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये काही वाद आणि मतभेद असतात, त्यामुळे एकमेकांचे काम काही ठिकाणी केले गेले नाही हे खरे आहे.” वरिष्ठ नेते नाराजी दूर करतील “या वादाचा महायुतीवर कोणताही गंभीर परिणाम होणार नाही. पुढचे 4 ते 5 दिवस ही नाराजी दिसेल, पण आमचे तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून सर्व नाराजी दूर करतील आणि महायुती महाराष्ट्रात पूर्वीप्रमाणेच अधिक ताकदीने काम करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ——————————————————— हेही वाचा… शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करा: आमदार गायकवाडांच्या भूमिकेशी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहमत आहेत का?- वडेट्टीवार महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत, दुसरीकडे अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पुढील जून महिन्यापर्यंत उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याची गरज असताना सरकार मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी वापरणाऱ्या उद्योगांना परवानग्या देत आहे. शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, ओबीसी समाज आणि पर्यावरणाचे प्रश्न गंभीर झाले असताना सरकारचे लक्ष केवळ सत्तेतील कुरघोड्यांकडे आहे, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation मातृभूमी सेवा पुरस्कारांचे पुण्यात वितरण:डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, सत्याचे राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकरण व्हावे Shiv Sena Leader Anand Paranjpe Warns BJP Over Sanjay Gaikwad Controversy