कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठ्याच्या उद्देशाने राज्य सरकारने २०२३ मध्ये “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ आणली होती. जानेवारी-२०२४ मध्ये कंपन्यांच्या निवडीसाठी निविदा निघाल्या. निवड झालेल्या कंपन्यांना प्रतिमेगावॅट ५ लाख रुपये परफॉर्मन्स बँक गॅर . मात्र, त्यांनी बँकांमध्ये कोणतीही रक्कम जमा न करता बँकांचे बनावट ईमेल आयडी आणि खोट्या शिक्क्यांचा वापर करून गॅरंटी सादर केली होती. ‘दिव्य मराठी’च्या हाती आशा बनावट गॅरंटीच्या ३ प्रती लागल्या आहेत. गॅरंटी पत्रावर अधिकाऱ्यांची सही, शिक्का अन् क्रमांक बोगस नमूद केला आहे. बँकेने मात्र आमचे या गॅरंटी आमच्या नसल्याचे स्पष्ट केले आहे. खरी पद्धत : १.लाभार्थी संस्थेला सुरक्षित वित्तीय संदेश प्रणालीद्वारे (एसएफएमएस) मेसेज जातो. २.संबंधित विभाग बँकेच्या अधिकृत ईमेलवरून लेखी खात्री करतात. अशी बनवेगिरी केली: १.एसएफएमएस पूर्णपणे टाळून, हुबेहूब मूळ बँकेसारखे दिसणारे खोटे मेल आयडी तयार केले. २. बोगस ईमेलवरून गॅरंटी खरी असल्याचा बनावट ईमेल पाठवून फसवले. एका कंपनीविरूद्ध तर मुंबईत गुन्हा दाखल २०२५ मध्ये ओम यश सिजेआर विया प्रोजेक्ट्स प्रा. लि.ने ९९.५० कोटीची बनावट बँक गॅरंटी सादर करून काम मिळवले. उघडकीस आल्यावर १० जानेवारी २०२६ रोजी मुंबईत गुन्हा दाखल झाला. कंपन्यांकडून गॅरंटीच्या रकमेइतकी एफडी किंवा स्थावर मालमत्ता तारण घेतली जाते. सुरक्षिततेची कायदेशीर हमी म्हणजे बँक गॅरंटी कंत्राटदाराने करारातील अटींचा भंग केल्यास संबंधित विभागाला नुकसान भरपाई द्यावी लागते. बँकेने घेतलेली कायदेशीर जबाबदारी म्हणजे बँक गॅरंटी. कंपनीची आर्थिक क्षमता, उलाढाल, पत तपासून गॅरंटी दिली जाते. कंपन्यांकडून गॅरंटीच्या रकमेइतकी एफडी किंवा स्थावर मालमत्ता तारण घेतली जाते. होय, बँक गॅरंटी बनावटच होय, बनावट गॅरंटीचे प्रकरण खरे आहे. पण अधिकारीच काय मी सुद्धा भाष्य करू शकत नाहीत. -भारत पवार, सीपीआरओ, महावितरण, मुंबई वरिष्ठांना माहिती दिली बनावट गॅरंटीबाबत वरिष्ठांना माहिती दिली. माझी बदली झाल्याने पुढील माहिती नाही- कुसुम लता, पंजाब अँड सिंध बँक, खार शाखा, मुंबई नेकॉफ ऊर्जा : ४९.५० कोटी क्षमता : ९९० मेगावॅट एसपीव्ही : एनओपीएल पेस ग्रीन एनर्जी गॅरेंटी:आधी आयसीआयसीआय नंतर बँक ऑफ बडोदा रक्कम : ४९.५० कोटी बनावट ईमेल : cfsbal@bankofbaroda.co.in ऐवजी cfsbal@bob.co.in याबाबत तिन्ही कंपन्यांचे मत जाणून घेण्यासाठी ईमेल केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. एनओपीएल सोलार : ४८.५० कोटी क्षमता : ९६९ मेगावॅट एसपीव्ही: एनओपीएल सोलर प्रोजेक्ट्स गॅरेंटी : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या साल्किया शाखा, हावडा, कोलकाता रक्कम : ४८.४५ कोटी बनावट ईमेल: bmkols3751@centralbank.co.in ऐवजी bmkols3751@cbi.com इंटिग्रेशन पावर : १३.६५ कोटी क्षमता : २७३ मेगावॅट एसपीव्ही: IIPL 3 हिंगोली(१४२ मेगावॅट), IIPL 4 परभणी (१३१ मेगावॅट) गॅरेंटी : पंजाब अँड सिंध बँक, मुंबई रक्कम :अनुक्रमे ७.१० व ६.५५ कोटी, एकूण १३.६५ कोटी बनावट ईमेल : B0300@psb.bank.in ऐवजी B0300@psb.co.in आमचा काहीही संबंध नाही आमच्या बँकेची बनावट गॅरंटी तयार केल्याप्रकरणी आम्ही काहीच करू शकत नाही. बँकेशी त्याचा संबंध नाही. -बिपिन गुप्ता, मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, साल्विया, हावडा बँकेसह कंपन्यांचेही मौन याबाबत बँक ऑफ बडोदाच्या मुंबईतील बॅलार्ड पिअर शाखेशी संपर्क साधला. परंतु बँकेने माहिती देण्यास नकार दिला. यामुळे त्यांचे म्हणणे समजू शकले नाही. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 12 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation कॉसमॉस बँकेच्या मदतीसाठी प्रदीप खेडकर यांचा सत्कार:अमरावतीतील प्रयास विशेष शाळेत सपत्नीक गौरव; डॉ. सरिता कडू यांचाही सत्कार रेशनसाठी प्राधान्य कुटुंबाची उत्पन्न मर्यादा दोन लाख:‘अंत्योदय’ची दीड लाख करा, इगतपुरीत बंद धान्यपुरवठा एका महिन्यात सुरू करण्याची आगरी सेनेची मागणी