हार्दिक पांड्याविरोधातील तक्रार अर्ज अहमदाबाद पोलिसांकडे वर्ग:राष्ट्रीय ध्वजाच्या अवमानाप्रकरणी पुढील चौकशीसाठी हस्तांतरित

0
26993c80-fe87-42cb-8ca7-e560a8052782_1775575005886.jpg




भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याविरोधात दाखल करण्यात आलेला तक्रार अर्ज पुढील चौकशीसाठी अहमदाबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु अधिकारक्षेत्रानुसार तो गुजरात येथील पोलिसांना हस्तांतरित करण्यात आला आहे. हा अर्ज बीड येथील वाजेद खान (बीडकर) यांनी दाखल केला होता. यामध्ये हार्दिक पांड्याने राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचा आरोप आहे. भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर झालेल्या जल्लोषादरम्यान हार्दिक पांड्याने आपल्या प्रेयसीसोबत मैदानावर आनंद व्यक्त करताना राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांना हार्दिक पांड्या (रा. खार पश्चिम, मुंबई) यांच्याविरोधात तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जाचे अवलोकन केल्यानंतर, संबंधित घटना अहमदाबाद (गुजरात) येथील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर घडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार अहमदाबाद पोलिसांकडे येतो, असे शिवाजीनगर पोलिसांनी स्पष्ट केले. यामुळे, शिवाजीनगर पोलिसांनी हा तक्रार अर्ज पुढील कारवाईसाठी पोलिस आयुक्त, अहमदाबाद यांच्याकडे वर्ग केला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी तक्रारदार वाजेद खान यांना समजपत्र देऊन माहिती दिली आहे. काय घडलेला प्रकार टी २० विश्वचषक विजयाच्या जल्लोषा दरम्यान खेळाडूंकडून आनंदोत्सव साजरा केला जात होता. याच दरम्यान सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओ मध्ये हार्दिक पांड्या याने भारतीय राष्ट्रीय ध्वज हाताळताना अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता.राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचा आरोप वकील वाजेद खान बिडकर यांनी करून पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed