जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना फुटाणे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती नांदेड – आज दि. २७ ऑक्टोबर रोजी जागतिक जंतनाशक दिना निमित्ताने संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये १ वर्षे ते १९ वर्ष वयोगटातील सर्व बालक व युवकांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्याची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन अर्धापूर तालुक्यातील मालेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये, राज्यस्तरीय सनियंत्रण अधिकारी डॉ किरणकुमार वाघमारे यांच्या उपस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना डॉ संतोष नवले जिल्हा आरोग्य अधिकारी व वंदना फुटाणे शिक्षणाधिकारी महोदयांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अल्बेन्डेझोल ही जंतनाशक गोळी खाऊ घालून करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी साहेबांनी सुदृढ समाजासाठी सुदृढ आरोग्याचे महत्त्व विशद केले. सुदृढ आरोग्यासाठी विद्यार्थी व बालकांचे शरीर जंतमुक्त असले पाहिजे अशी माहिती दिली. व त्याकरिताच आज रोजी राबवण्यात येत असलेल्या जंतनाशक गोळी ग्रहण करण्याचे फायदे विशद केले.शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना आजच्या कठीण स्पर्धेत राहण्यासाठी अभ्यासाचे महत्त्व विशद केले व चांगला अभ्यास करायचा असेल तर चांगले आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे हे विशेषत्वाने नमूद केले.याप्रसंगी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ तोटावाड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे, गटशिक्षणाधिकारी अर्धापूर अजित तरवटे, आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. एस पी गोखले, पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव इंगोले, मालेगावचे सरपंच मारोतराव बुट्टे, माजी सरपंच अनिल इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्याम सावंत,डॉ. रोहिणी जाधव तसेच जिल्हा परिषद हायस्कूल मालेगाव येथील मुख्याध्यापक पुप्पलवाड सर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक शिवा कांबळे सर, संतोष थोरात, अनिल पिंपळे,एस एम पाटील, श्रीकांत शिंदे, श्रीमती अनुजा देशपांडे, श्रीमती मुखडे, श्रीमती पवार, गणेश शिराळ, श्रीमती अनिता कोंटमवाड, श्रीमती ललिता थोरात, अमोल यादव व श्री पंकज गोरे यांनी विशेष पुढाकार घेतला. Post Views: 374 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 7 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation कृष्णा उमरीकर यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर;शिर्डी येथे ३ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा वाहेगावात अवैध वाळू उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा; १ कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त