'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यात थापल्या चुलीवर भाकऱ्या:गॅस टंचाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

0
new-project-76_1775478955.gif




सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर महागाईचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवून चक्क भाकऱ्या थापल्या. या प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून सातारा जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले. सातारा येथे राज्यभरातील गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. “नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर ” या घोषणांनी लक्ष वेधून घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा लगत चूल पेटवून कार्यकर्त्यांनी चक्क भाकऱ्या थापल्या. या आंदोलनाबाबत बोलताना रामदास कांबळे म्हणाले, गॅस तुटवड्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. छोटे व्यावसायिक हॉटेल्स तसेच विद्यार्थ्यांच्या जीवन व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अकोला व अमरावती येथे गॅस साठी रांगेत उभे राहणाऱ्यांची मृत्यू झाले आहेत. गॅसची कृत्रिम टंचाई थांबवणे काळाबाजार रोखणे सिलेंडर वितरणाची अट शिथिल करणे कम्युनिटी किचन सुरू करणे इत्यादी मागण्या प्रशासनाकडे करण्यात आले आहेत. याबाबत शासनाने तातडीने भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed