[ads1]
![]()
गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत कडोळी येथे अदखलपात्र गुन्ह्यात जामीन मिळवून देतो तसेच विरोधी गटावर कारवाई करण्यासाठी तीन हजाराची लाच घेतांना गोरेगाव पोलिस ठाण्याच्या जमादारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ता. 11 सायंकाळी गोरेगाव ते खांबाळा चौफुली येथे रंगेहात पकडले. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत कडोळी येथे भावकीच्या दोन गटात वाद झाला होता. याप्रकरणात तक्रारदारावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास जमादार राहुल मैंदकर याच्याकडे होते. या तपासामध्ये जामीन मिळवून देण्यासाठी तसेच विरुध्द गटावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी जमादार मैदकर याने चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर यामध्ये तडजोड होऊन तीन हजार रुपये देण्याचे ठरले होते. या प्रकरणात तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. यावरून लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार राजाराम फुपाटे, गजानन पवार, विनोद पुंडगे, शिवाजी वाघ, शेख अकबर, भगवान मंडलिक यांच्या पथकाने आज सायंकाळी गोरेगाव पासून काही अंतरावर असलेल्या गोरेगाव ते खांबाळा चौफुली येथे सापळा रचला होता. दरम्यान, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मैंदकर याने तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्विकारताच लाचलुचपतच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले.
[ads2]
गोरेगाव पोलिस ठाण्याचा जमादार एसीबीच्या जाळ्यात:3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; अदखलपात्र गुन्ह्यात जामीन मिळवून देण्याची घेतली लाच
















Leave a Reply