🚨 **मुखेड भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा मोठा सापळा!** 🚨
💰 **१५ हजारांची लाच घेताना शिपाई रंगेहात ताब्यात!**
⚖️ **निमतानदारावरही गुन्हा दाखल!**
मुखेड | नांदेड
शेतजमिनीच्या मोजणीचा अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी **१५,००० रुपयांची लाच स्वीकारताना मुखेड भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई विवेकानंद पांडुरंग खुडे (वय ३५)** याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कथित लाचखोरीचा प्रकार समोर आला असून, **निमतानदार सय्यद इमरान सय्यद इकबाल** याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
📌 **नेमकं प्रकरण काय?**
७२ वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे मुखेड येथील गट क्रमांक ६१ मध्ये **५३ आर शेतजमीन** आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शेतजमिनीची मोजणी केली.
मात्र, मोजणीचा अहवाल न्यायालयात पाठवण्यासाठी **“साहेबांना पैसे द्यावे लागतील”** असे सांगण्यात आल्याचा आरोप आहे.
त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदाराने कार्यालयात चौकशी केली असता, **१५ हजार रुपये दिल्याशिवाय अहवाल पाठवला जाणार नाही**, अशी लाचेची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
📞 तक्रार एसीबीकडे पोहोचली…
२ सप्टेंबर रोजी एसीबीने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत शिपाई खुडे याने **१५ हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.** तसेच निमतानदाराशी मोबाईलवरून बोलणे करून दिल्यानंतर त्यानेही लाच स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.
🎯 त्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान **१५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच विवेकानंद खुडे याला रंगेहात पकडण्यात आले.**
⚖️ भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील **कलम ७ व १२** अन्वये कारवाई करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई नांदेड एसीबीच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
📢 **लाच मागणाऱ्यांविरोधात आवाज उठवा!**
शासकीय कामासाठी कोणी लाच मागितल्यास **एसीबी टोल फ्री क्रमांक १०६४** वर संपर्क साधा.
#मुखेड #नांदेड #Nanded #mukhed #ACB #लाचखोरी #लाचलुचपत #भ्रष्टाचार #acbtrap #anticorruption #भूमीअभिलेख #शेतकरी #शेतजमीन #महाराष्ट्र #nanded #maharashtranews #BreakingNews #NandedNews #MarathiNews #मराठीबातम्या #ViralNews #instagramnews #NewsUpdate

















Leave a Reply