महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीबाई मागासवर्गीय महिला मंडळ बहादरपुरा ता . कंधार जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व्यसनमुक्ती अभियान संगीत रजनी कार्यक्रम संपन्न झाला.
2026 27 या वर्षात हा कार्यक्रम संपन्न होत असताना कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यात आली. माहुर येथिल श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माहूर येथे कार्यक्रम पार पडला गटशिक्षणाधिकारी श्री शेट्टकर साहेब यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमास प्राचार्य विश्वासराव जाधव सर उप प्राचार्य फारुख सर ,भुपेंद्र भारती, प्रा. संतोष वानखेडे , कांचन धोंडगे मैडम, आम्रपाली शेळके मैडम , जायभाये सर ,नारायणन शिंदे सर , अमोल पटनमने सर , अविनाश सातव सर , हामिद गल्ली सर, हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कपिल वाघमारे यांनी केले महाराष्ट्र शासनाच्या स्तुत्य उपक्रमांची व महात्मा गांधी व्यसन मुक्ती अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली सदरील कार्यक्रमांतर्गत संगीत रजनी कार्यक्रम सुरू करण्यात आला त्यात समाज दिवसें दिवस व्यसनाधीन होत आहे यामध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत आहे समाज व्यसनमुक्त होऊन सशक्त भारत समृद्ध भारत निरोगी युवा व्हावा असा संदेश देण्यात आला.
महाविद्यालयात संगीत रजनी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला
सशक्त देश घडवण्याचे कार्य व्यसनमुक्ती कार्यक्रमातून विविध विषयावर तज्ञांच्या मार्गदर्शनातून नशा मुक्ती ची शपथ घेऊन गीत गायनातून समाज प्रबोधन करण्यात आले. यावेळी शाहिर बापुराव जमदाडे शिराढोणकर, शाहिर केशव केंद्रे,ढोलकि प्रविण सोनकांबळे,ऑर्गन विकास गायकवाड , तुनतुने दिलीप कोसले, गाडगेबाबाच्या भुमिकेत विश्वनाथ बसवंते आदिनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माहुर येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम संपन्न
















Leave a Reply