[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहाशी संपर्क साधून तत्काळ प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत.
अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असताना स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या आणि पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे वसतिगृह प्रवेशाची संधी उपलब्ध होत नव्हती. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच ते वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांना वसतिगृह प्रवेशासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी वसतिगृहास भेट देऊन प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत.
विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाच्या अधिकृत Instagram व Facebook पेज samajkalyannanded ला फॉलो करून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणारी अधिकृत माहिती पाहावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी अधिकृत व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले असून, त्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावे. कोणत्याही अनधिकृत ग्रुप किंवा व्यक्तीकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून न राहता अडचणी किंवा शंका असल्यास समाज कल्याण कार्यालयातील संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधावा.
स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळत असल्याने पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपला परिपूर्ण अर्ज विहित मुदतीत सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
[ads2]















Leave a Reply