नांदेड(प्रतिनिधी)-रासायनिक खतांच्यासोबत बळजबरीने होत असलेल्या इतर वाहनांची लिंकींग विक्री बंद करणे, जिल्ह्यासाठी मंजुर झालेला खतसाठा जिल्ह्यामध्येच विक्री करणे, खात वाहतुक ठेकेदारी संबंधीत कृषी व्यापाऱ्यांना न देता दुसऱ्या कंपनीला द्यावे असा अर्ज नांदेड जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघाने जिल्हाधिकारी नांदेड यांना दिला आहे. याच आशयाचे एक पत्र दोन दिवसांपुर्वीद्य संघटनेने केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांना सुध्दा दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदरच या प्रकरणात कृषी विभागातील चौकशी लावलेली आहे. पण त्या चौकशीचा निर्णय काय झाला याची माहिती प्राप्त झालेली नाही.
रासायनिक खत कंपन्या छोट्या व्यापाऱ्यांना बळजबरीने त्यांना गरज नसलेल्या साहित्याची अनाधिकृत विक्री करते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्यदरात खत उपलब्ध होत नाही. नांदेड जिल्ह्याचा खतसाठा नांदेड जिल्ह्यातच विक्री व्हावा. तर शेतकऱ्यांना मुबलक खत साठा उपलब्ध होईल. सर्व खत कंपन्यांकडून पोहच देण्यात यावी. त्यांची वरईची रक्कम वाहतुक ठेकेदारांकडून किरकोळ विक्रेत्यांना देण्यात यावी. खताच्या वाहतुक ठेकेदाराचे काम संबंधीत खत विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचा नातलगांच्या नावावरच आहे. त्यामुळे त्यात गोंधळ होतो. तेंव्हा वाहतुक ठेकेदारी दुसऱ्या कंपनीला देण्यात यावी. किरकोळ खत विक्रेता व्यापाऱ्यांच्या नफ्याची मार्जिंग वाढवावी. बफर स्टॉकमधील साहित्याला लिंकींग नसते. ते साहित्य अधिकृत विक्रेत्याकडून किरकोळ विक्रेत्यांना देण्यात यावे. जेणे करून शेतकऱ्यांपर्यं हे साहित्य योग्य वेळेत पोहचेल.
कृषी विभागात, इफ्को खतात होणारा गोंधळ, वाटपाची पध्दत, घेतला जाणारा वाटपाचा कार्यक्रम या संदर्भाने अनेक गोंधळांचा एक अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला होता. त्या संदर्भाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. परंतू अद्याप याबाबत चौकशीच झाली नाही असे सांगितले जाते. कृषी विभाग तर मी नाही त्यातली या अर्वीभावात आपल्या कानावर हात ठेवत आहे. मग ती चौकशी पुर्ण कशी होईल आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल की, नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
Leave a Reply