नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील पोलीस उपमहानिरिक्षक ते पोलीस शिपाई अशा 800 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह/ बोधचिन्ह प्रदान केले आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यातील दहा पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश आहे.
दरवर्षी 1 मे रोजी राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीसांचा सन्मान करण्यासाठी पोलीस महासंचालक आपल्यावतीने सन्मान चिन्ह/बोधचिन्ह प्रदान करतात. यंदाच्या या यादीत 800 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पिंपरी चिंचवड आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक सुधीर खोडवे, कुंडलवाडी येथील पोलीस उपनिरिक्षक गजेंद्र मांजरमकर, राज्य गुप्त वार्ता विभाग नांदेड येथील पोलीस अंमलदार व्यंकट परशुराम शिंदे, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग नांदेड येथे कार्यरत पोलीस अंमलदार विनायक किर्तने, पोलीस ठाणे उस्माननगर येथे कार्यरत पोलीस अंमलदार सुशिल कुबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नांदेड शहर येथील पोलीस अंमलदार गजानन कदम, देगलूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार किरण कुलकर्णी , लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे कार्यरत चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. सर्व सन्मानप्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांचे वास्तव न्युज लाईव्ह परिवाराच्यावतीने अभिनंदन. ज्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह/ बोध्दचिन्ह प्राप्त झाले आहे त्यांना ते 1 मे रोजीच्या ध्वजवंदन कार्यक्रमानंतर प्रदान केले जातात.
राज्यातील 800 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांच्या सन्मानचिन्ह आणि बोधचिन्हा प्रदान करण्यात आलेली पीडीएफ संचिका बातमीसोबत वाचकांच्यासोयीसाठी जोडली आहे.
Leave a Reply